कुडाळमध्ये वाळू व्यावसायिकांमध्ये हाणामारी

By Admin | Updated: July 6, 2014 00:30 IST2014-07-06T00:30:29+5:302014-07-06T00:30:57+5:30

दोघांच्या डोक्यालागंभीर दुखापत

Crocodile in the traders in Kudal | कुडाळमध्ये वाळू व्यावसायिकांमध्ये हाणामारी

कुडाळमध्ये वाळू व्यावसायिकांमध्ये हाणामारी

कुडाळ : शहरातील बबन नाका येथे अधिकृत व अनधिकृत वाळू व्यावसायिकांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये दोघांच्या डोक्यालागंभीर दुखापत झाली. त्यामुळे वाळू व्यावसायिकांमधील वाद मोठ्या प्रमाणात उफाळण्याची शक्यता आहे.
कुडाळ ग्रामीण रुग्णालयासमोर बबन नाका येथील काही वाळू व्यावसायिक सायंकाळी गोळा होतात. शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास काही वाळू व्यावसायिक तेथे उभे होते. एका वाळू व्यावसायिकाची गाडी आली. त्यातून दोन युवक बाहेर पडले व उभ्या असलेल्या वाळू व्यावसायिकांपैकी एकाला मारहाण केली. यातून दोन्ही गटांमध्ये काही क्षणातच हाणामारी सुरू झाली.
या हाणामारीत गाडीमध्ये बसून आलेले दोन युवक डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. यात तेथील नागरिकांनी हस्तक्षेप करीत या दोन्ही गटांना बाजूला केले.
जखमी युवकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. या हाणामारीचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crocodile in the traders in Kudal