शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

फक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 6:35 PM

Vinayak Raut shivsena Kankavli Sindhudurg-शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे व त्यांचे पुत्र टीका करीत आहेत. मात्र, कोणावर तरी फक्त टीका करून येथील विकास होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देफक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

कणकवली : शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे व त्यांचे पुत्र टीका करीत आहेत. मात्र, कोणावर तरी फक्त टीका करून येथील विकास होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यांचे विविध घोटाळे आम्हाला माहीत असून विनाकारण आमच्या कोणी वाकड्यात शिरले तर त्याला सरळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले. कणकवली येथील महाडिक कंपाऊंड परिसरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, कामगार नेते निलेश पराडकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, युवानेते संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, बाळा भिसे, महिला जिल्हा संघटक निलम सावंत-पालव, शैलेश भोगले, मिलिंद साटम, रवींद्र जोगल, विलास साळसकर, सुशांत नाईक, गितेश कडू, दिगंबर पाटील, राजू राठोड, प्रथमेश सावंत, हर्षद गावडे आदी उपस्थित होते.विनायक राऊत म्हणाले, उद्याच्या महा विकास आघाडीच्या आमदाराचे हे कार्यालय आहे. विकासाचे शिवधनुष्य उदय सामंत आणि माझ्याकडे आहे. मतदारसंघाशी आमचे घट्ट नाते असून राणेंनी त्यांच्या पदाला शोभेल अशी टीका करावी. तुम्हाला शिवसेनेने मुख्यमंत्री केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. उद्धव ठाकरे दुष्मनावर सुद्धा प्रेम करतात. असेही ते म्हणाले.

खासदार राऊत म्हणाले, पोपट पंची करणारा माजी आमदार मला शिव्या घालणार असेल तर घालू दे. मात्र , मी रिफायनरीचे समर्थन करणार नाही. आम्ही इनोव्हेशन कोकण योजना आणणार आहोत. मी खासदार झालो तेव्हा चिपी विमानतळाचे १४ टक्के फक्त काम झाले होते. आता काम पूर्णत्वास जात आहे. २५०० रुपयात मुंबईला जाता येणार आहे. तेथून दररोज विमाने विविध ठिकाणी जाणार आहेत.

जिल्ह्यातील पाणी पुरवठा प्रकल्प आहेत त्यांची पाहणी आम्ही करणार असून येत्या तीन वर्षात ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी अरूण दुधवडकर, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, निलम सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले.आता पेटून उठले पाहिजेज्यांच्याजवळ विकासाचे काहीच मुद्दे नाहीत ते नुसती टीका करीत आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायतीबरोबरच आगामी सर्व निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविले पाहिजे. त्यासाठी शिवसैनिकांनी आता पेटून उठले पाहिजे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांना सरंक्षण तर मिळेलच. पण , त्यांच्या पाठीमागे सरकार म्हणून आम्ही सर्वजण असू ,असे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली