शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करा; कणकवली पोलिस ठाण्यासमोर ठाकरे शिवसेनेचे धरणे आंदोलन

By सुधीर राणे | Updated: October 19, 2023 15:58 IST

कणकवली : तालुक्यातील नांदगाव तिठा येथे अनधिकृतपणे बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री केली जात आहे. त्या विक्रेत्यावर पोलिसांनी कोणतीही ...

कणकवली: तालुक्यातील नांदगाव तिठा येथे अनधिकृतपणे बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री केली जात आहे. त्या विक्रेत्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने गुरुवारी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून कणकवलीपोलिस  ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'बंद करा ,बंद करा अनधिकृत दारू विक्री बंद करा' अशा घोषणा देत पोलिस ठाण्याचा परिसर शिवसेना कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता. दरम्यान ,पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांना' त्या ' दारू विक्रेत्यावर लवकरात लवकर कारवाई होईल. असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, माजी नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नांदगाव तिठा येथे गोवा बनावटीची दारू विक्री उघडपणे केली जात आहे. कारवाईची मागणी करुनही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच सुरेंद्र गणपत वायंगणकर हे राजरोसपणे दारू विक्री करत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचा फक्त देखावा केला. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही असे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना दिले होते. त्यानुसार ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाप्रमुख संदेश पारकर व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.या आंदोलनादरम्यान पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्याशी चर्चा करताना पोलिसांवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रश्नांच्या भडीमार केला. आम्हाला तुमच्या विरोधात आंदोलन करण्याची पुन्हा वेळ येऊ नये याकरिता संबंधितांवर कारवाई करा. तसेच कुणालाही पाठीशी घातले जाता नये. कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी संदेश पारकर व सतीश सावंत यांनी केली. दारू विक्री कायमस्वरूपी बंद न झाल्यास ६ नोव्हेंबर रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाKankavliकणकवलीPoliceपोलिस