शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Coronavirus Unlock :कोरोनामुक्त मालवण पॅटर्न कायम ठेवूया! :महेश कांदळगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:05 IST

स्वयंशिस्तीचा एक वेगळा आदर्श मालवण शहरवासीयांनी जिल्ह्यासमोर ठेवूया, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जनतेला केले आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्त मालवण पॅटर्न कायम ठेवूया! :महेश कांदळगावकर स्वयंशिस्त शहराचा वेगळा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवण्याचे आवाहन

मालवण : मालवण शहरवासीयांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळे आजपर्यंत मालवण शहर कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले. यापुढेही मालवण शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी अधिक खबरदारी घेत स्वत:ची आचारसंहिता प्रत्येकाने अमलात आणावी.

स्वयंशिस्तीचा एक वेगळा आदर्श मालवण शहरवासीयांनी जिल्ह्यासमोर ठेवूया, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जनतेला केले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा सरसकट लॉकडाऊन केल्याने संकटात असलेला व्यापारीवर्ग संतप्त बनला आहे.बाधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी अटी शर्तींसह जी शिथिलता होती ती मिळावी. सरसकट लॉकडाऊन नको ही व्यापारी बांधवांची भूमिका त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. व्यापारीवर्ग खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत. मालवण पालिकाही व्यापारी वर्गासोबत आहे, असेही कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.शासन-प्रशासन आपल्यापरीने कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना शक्य आहेत त्या सर्व अमलात आणणारच आहे. त्यासाठी आपल्याला तयार रहावे लागेल. त्याबरोबर आपणही अधिक खबरदारी घेऊन कोरोनाच्या जवळ न जाता त्याला दूर ठेवण्यासाठी स्वत:ची आचारसंहिता आखल्यास आपल्यासह कुटुंब व परिसराच्या दृष्टीने ती अधिक फायद्याची ठरेल. सर्वांनी याची अंमलबजावणी केल्यास आपला कोरोनामुक्त पॅटर्न इतरांना आदर्शवत ठरेल.आॅगस्ट महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीपूर्वी कोरोना संकटावर मात करण्यासाठी अथवा कोरोना संकट दूर ठेवण्यासाठी नागरिकांसह सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊया. कोरोनामुक्त मालवण पॅटर्न कायम राहण्यासाठी आपल्या सर्वांची साथ, सहकार्य जसे यापूर्वी देत आलात तसे यापुढेही महत्त्वाचे आहे, असेही नगराध्यक्ष यांनी स्पष्ट करीत प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास कोरोना दूर ठेवणे शक्य असल्याचे सांगितले.नगराध्यक्ष १४ दिवस होम क्वारंटाईन राहणारनगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या भावाचे काही दिवसांपूर्वी मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर तातडीने ते मुंबईला गेले होते. त्याठिकाणी नगराध्यक्ष १२ दिवस राहिले. दोन दिवसांपूर्वी ते मालवणात आले असून कुटुंबासमवेत ते १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग