सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने आठ रुग्ण सापडले असून जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याबाबतचे स्वॅब दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले होते, त्यामध्ये हे रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. कोरोना रुग्णांमध्ये कणकवलीतील सहा तर मालवण व वैभववाडी तालुक्यातील एक एक रुग्णाचा समावेश आहे. याबाबतच्या माहितीला जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा चाकूरकर यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 16 झाली आहे. कणकवली तालुक्यातील डांबरे येथील 4 रुग्ण, ढालकाठी येथील 2 , मालवण तालुक्यातील हिवाळे येथील 1 तर वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील 1 रुग्णाचा यात समावेश आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! सिंधुदुर्गात एकाच दिवशी ८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 15:31 IST