शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता, बससेवा सुरू, कर्फ्यू मात्र लागूच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:58 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी यांनी शिथिलता दिली आहे. मात्र, सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कलम १४४ अर्थात कर्फ्यू लागूच राहणार आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता : के. मंजुलक्ष्मी बससेवा सुरू, कर्फ्यू मात्र लागूच..!

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गुरुवारपासून लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी यांनी शिथिलता दिली आहे. मात्र, सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कलम १४४ अर्थात कर्फ्यू लागूच राहणार आहे.

बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, मॉल वगळता इतर सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील. सर्व शासकीय कार्यालये, जिल्हांतर्गत एसटी बससेवा व रिक्षाही सुरू राहतील. मास्क न वापरल्यास दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक माहिती अधिकारी जाधव उपस्थित होते.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, राज्य शासनाने बुधवारपासून जिल्ह्यात काय सुरू ठेवावे व काय सुरू ठेवू नये याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान सुरू राहतील.

दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, त्याठिकाणी गर्दी झाल्यास दुकान तत्काळ बंद करून गर्दी पांगविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बससेवा ही सुरू ठेवली जाणार आहे. सोशल डिस्टन्स ठेवून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. ५० टक्के प्रवासी त्या बसमध्ये असणार आहेत. रिक्षा वाहतूकही सुरू ठेवली जाणार आहे.रिक्षात चालक आणि दोन प्रवासी अशी नियमावली असेल. घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. कापडी रुमालही चालेल. परंतु मास्क आवश्यक आहे. मास्क न वापरलेल्या व्यक्तीला २०० रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. हे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस यांना दिले आहेत. यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंडाची तरतूद पुढेही सुरू राहणार आहे.आठवडा बाजार सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत नियमावली तयार करण्याचे काम केले जात आहे. राज्य शासनाने चौथ्या लॉकडाऊनमध्ये रेड झोन व नॉन रेड झोन असे दोनच झोन जारी केले आहेत. सिंधुदुर्ग हा नॉन रेड झोनमध्ये येतो. त्यानुसार ही नियमावली असेल.

कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या प्रत्येकास संस्थात्मक अलगीकरण व उर्वरितांना गृह अलगीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाले आहेत. त्यांना नियमावली समजण्यासाठी पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. होम क्वांरटाईनमध्ये असलेल्या नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे गुन्हा आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.सर्व शासकीय कार्यालये सुरू राहणारशासनाच्या नव्या निर्देशानुसार बंद असलेली शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. यात उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), रजिस्टर कार्यालय यासह अन्य कार्यालयांचा समावेश आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.सरपंचांचे केले अभिनंदन!ग्रामपंचायत स्तरावर बाहेरून आलेल्या नागरिकांची उत्तम व्यवस्था केली आहे. त्यामुळे सरपंच अभिनंदनास पात्र आहेत. तसेच रुग्णालय, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून एकही दिवस या कर्मचाऱ्यांनी सुटी घेतली नाही. या काळात प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातून मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान येथे मजूर जाण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी परवानगी मागितली आहे. त्या त्या राज्यांनी परवानगी दिल्यास रेल्वेने त्यांना गावी पाठविण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी