CoronaVirus Lockdown : तब्बल ५0 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:15 IST2020-04-25T15:12:44+5:302020-04-25T15:15:15+5:30
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या रागातून कोलगाव येथील युवकाच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CoronaVirus Lockdown : तब्बल ५0 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
सावंतवाडी : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या रागातून कोलगाव येथील युवकाच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यातील २० जणांना येथील पोलीस ठाण्यात बोलावून नोटीस देण्यात आली. तर दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली. हा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता.
याप्रकरणी आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या युवकाला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तर घटनेदिवशी युवकाच्या घरात घुसणाऱ्याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी मागितली होती.
याप्रकरणी परवानगी दिली असून पोलिसांनी ५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर याप्रकरणी वीस जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर दोन दुचाकीही जप्त केल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.