शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :दारू वाहतूक स्थानिकांनी पकडली, कुंब्रल येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:53 IST

गोव्यातून कुंब्रलमार्गे चंदगडला होत असलेली दारू वाहतूक कुंब्रल येथील स्थानिक युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. या कारवाईत ३ लाख ४५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सतीश भीमराव आरदाळकर (३१, रा. हडकुळ, ता. चंदगड, कोल्हापूर), अतुल वसंत शिंदे (२६ रा. सदर), श्रीशैल अशोक बिराजदार (२८) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. ग्रामस्थांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असून पोलीस यंत्रणेचे अपयश मात्र स्पष्ट दिसत आहे.

ठळक मुद्देदारू वाहतूक स्थानिकांनी पकडली, कुंब्रल येथील घटना साडेतील लाखांचा मुद्देमाल जप्त

दोडामार्ग : गोव्यातून कुंब्रलमार्गे चंदगडला होत असलेली दारू वाहतूक कुंब्रल येथील स्थानिक युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. या कारवाईत ३ लाख ४५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सतीश भीमराव आरदाळकर (३१, रा. हडकुळ, ता. चंदगड, कोल्हापूर), अतुल वसंत शिंदे (२६ रा. सदर), श्रीशैल अशोक बिराजदार (२८) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. ग्रामस्थांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असून पोलीस यंत्रणेचे अपयश मात्र स्पष्ट दिसत आहे.राज्य व जिल्हा सीमा बंद असतांना गोव्याहून कुंब्रलमार्गे गेले चार दिवस रात्रीची एका चारचाकी वाहनाने दारू वाहतूक चालू होती. रात्रीच्या वेळी संशयास्पद होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवीत युवकांनी सापळा रचून रस्त्यावर दगड ठेवले व ग्रामस्थ लपून बसले. दरम्यान, वाहन आल्यावर रस्त्यात दगड पाहून चालकाने गाडी उभी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी गाडीला घेराव घालत गाडीचा तपास केला. त्यावेळी दारू वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी लगेच दोडामार्ग पोलीस ठाण्यात कळविले.पोलीस उपनिरिक्षक बागल व सहकारी यांनी त्याठिकाणी धाव घेतली व दारू वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले. तसेच वाहतुकीस सहाय्य करणाऱ्या दुचाकी चालकास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत ३ लाख ४५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यातील आरोपी सतीश आरदाळकर, अतुल शिंदे, श्रीशैल बिराजदार यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कुंब्रल रुमडाची गोठण व बोर्डेकरवाडी युवकांनी डोळ्यात तेल घालून केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. मात्र, पोलिसांचे दारू वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.सीमा बंद असतानाही राजरोस दारू वाहतूककोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व जिल्हा सीमा बंद करून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमा ओलांडून जाणे या घडीला तरी शक्य नाही. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानादेखील गोवा राज्यातून दोडामार्ग सीमेवरून चंदगडच्या दिशेने गेले चार दिवस राजरोसपणे दारू वाहतूक चालू होती. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेने याचा पर्दाफाश झाला.

चोख बंदोबस्त असताना सीमा ओलांडून दारूने भरलेली गाडी आलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर पोलीस व दारू विक्रेते यांच्या संगनमताशिवाय लाखोंची दारू वाहतूक होऊ शकत नसल्याचीही तालुक्यात चर्चा होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गliquor banदारूबंदीPoliceपोलिस