शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 17:58 IST

नडगिवातल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आले असून, ते आता निगेटिव्ह आले आहेत.

खारेपाटण :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील नडगिवे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोग्य खात्याने तात्काळ दखल घेऊन घरोघरी जाऊन व्यक्तिगत प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला होता. विशेष म्हणजे नडगिवातल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आले असून, ते आता निगेटिव्ह आले आहेत. कणकवलीचे आमदार नितेश राणेंनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.  विशेष म्हणजे नडगिव्यात रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक कार्यरत झाले होते. २७ मार्चला नडगिवे येथील सुमारे ३ किलोमीटरचा परिसर सिल करण्यात आला होता. नडगिव्यातील त्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नितेश राणेंनी जिल्हा वैद्यकीय टीमच्या कामाला सलाम केला. यामध्ये बांबरवाडी, गुंडयेवाडी, धावडेवाडी, मधलीवाडी, वाणीवाडी, गावठणवाडी, धुरेभाटलेवाडी, बौद्धवाडी, देऊळाडी, गावठणवाडी, शिक्षक कॉलनी, घोरपीवाडी तर रामेश्वरनगर खारेपाटण, वारगांव रोडयेवाडी, वारगाव मांडवलकरवाडी, वारगाव धावडेवाडी आदी १९ वाडीवस्त्यांच्या मिळून १९ कर्मचारी व ४ नोडल ऑफिसर यांनी मिळून सुमारे ३००० लोकसंख्येचा सर्व्हे केला, तर २८ मार्च २०२० रोजी आरोग्य विभागाच्या वतीने ७ किलोमीटरचा परिसर सिल करून सर्व्हे करण्यात आला.यामध्ये खारेपाटण कोंडवाडी, राऊतवाडी, कर्लेवाडी, कोष्टीवाडी, बौद्धवाडी, पंचशीलनगर, देऊळवाडी, जैनवाडी, भैरीवाडी, संभाजीनगर, खारेपाटण गुरववाडी, कासारवाडी, टाकेवाडी, खारेपाटण काजिर्डे काझीवाडी, खारेपाटण बंदरगाव-बंदरवाडी, खारेपाटण शिवाजीपेठ-बाजारपेठ त्याचबरोबर वारगाव-वरची सुतारवाडी, खालची सुतारवाडी, काणेकरवाडी, बौद्धवाडी, नरवाडी, धुमकवाडी, पवारवाडी अशा मिळून एकूण २५ भागातील ९३६ घरे व १०२९ कुटुंबातील एकूण ४०८९ लोकसंख्येच्या नागरिकांचा सर्व्हे २३ कर्मचारी अधिक ३ नोडल ऑफिसर यांनी मिळून केला होता.यामध्ये आरोग्यसेवक सहाय्यिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी सर्व्हे करण्यासाठी मदत केली. तर नोडल ऑफिसर म्हणून संकिता पाटणकर, शीतल नेवरेकर, संभाजी करलकर, मंजिरी बावकर हे काम पाहत आहेत. तर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम या संपूर्ण आरोग्य पथकाच्या प्रमुख असून, संपूर्ण परिस्थितीवर त्या लक्ष ठेवून आहेत. खारेपाटण बाजारपेठ पुढील काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. खारेपाटण शहराबरोबरच नडगिवे गावातसुद्धा कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या