corona virus-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला कोरोना सदृश्य रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:18 IST2020-03-16T14:16:42+5:302020-03-16T14:18:39+5:30
मुंबई-पुणे नंतर आता जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा १९ वर्षीय संशयित रुग्ण आढळला आहे. त्याला काल पहाटे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

corona virus-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला कोरोना सदृश्य रुग्ण
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला कोरोना सदृश्य रुग्णजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू; वैदयकीय अहवाल अदयाप प्राप्त नाही...
सिंधुदुर्ग : मुंबई-पुणे नंतर आता जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा १९ वर्षीय संशयित रुग्ण आढळला आहे. त्याला काल पहाटे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान त्याला कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत.संबंधित तरुण हा नवी मुंबई येथे एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ट्रेनिंग घेत होता.
तेथून तो ओरोस येथील आपल्या गावी परतला असता त्याला कोरोना सदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र तो कोरोना सदृश्य असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाही. याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.