शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

corona virus : पोलीस अधिकाऱ्यासह तीन कर्मचारी पॉझिटिव्ह, सर्वाधिक रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 6:43 PM

कणकवली : सिंधुदुर्गात रविवारी कोरोना बाधितांनी १५६ उच्चांकी आकडा गाठला आहे. त्यापैकी कणकवली तालुक्यात ३१ कोरोना बाधित रुग्ण सापडले. ...

ठळक मुद्देपोलीस अधिकाऱ्यासह तीन कर्मचारी पॉझिटिव्ह, सर्वाधिक रूग्ण कणकवलीत तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ४३७ वर

कणकवली : सिंधुदुर्गात रविवारी कोरोना बाधितांनी १५६ उच्चांकी आकडा गाठला आहे. त्यापैकी कणकवली तालुक्यात ३१ कोरोना बाधित रुग्ण सापडले. त्यात एक पोलीस अधिकाऱ्यासह ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

त्यामुळे पोलिसांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण गेले काही दिवस पॉझिटिव्ह आलेले पोलीस अनेक पोलिसांच्या संपर्कात आले आहेत. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ४३७ वर पोहोचली आहे.कणकवलीत पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांनी खारेपाटण, फोंडा तपासणी नाका व रेल्वे स्टेशन येथे सेवा बजावली होती. सध्या एक पोलीस उपनिरीक्षक व ३ पोलिसांवर उपचार सुरु आहेत.यातील दोन पोलीस जिल्ह्या बाहेरुन काही दिवसांपूर्वी आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.तसेच एक पोलीस यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता .

आता कणकवली पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे स्वँब आरोग्य विभागाला घ्यावे लागणार आहेत. नव्याने ३१ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४३७ वर पोहचली आहे.तालुक्यात शनिवारी रात्री ६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते , त्यात आज आणखी २५ जणांची भर पडली आहे . त्यामुळे एकूण ३१ कोरोना बाधित सापडले आहेत. फोंडाघाट गांगोवाडी येथील एका ६० वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

फोंडाघाट, गांगोवाडी येथे २७ जुलै रोजी मुंबई येथूून ते आले होते. त्यांचा कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला होता . गेल्या चार दिवसापासून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग