corona virus -कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:11 IST2020-03-23T17:08:27+5:302020-03-23T17:11:41+5:30
विनापरवानगी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

corona virus -कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश
सिंधुदुर्गनगरी : विनापरवानगी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची नाकाबंदी करून तपासणी करण्यासाठी सातार्डा येथे तपासणी पथकात वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करण्यात आली होती.
या पथकामधे हे वैद्यकीय अधिकारी कंत्राटी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु ते विनापरवानगी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.