corona virus : आमदार वैभव नाईक यांची कोरोनावर मात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:46 IST2020-07-27T18:44:08+5:302020-07-27T18:46:20+5:30
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांना व त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीला जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे .

corona virus : आमदार वैभव नाईक यांची कोरोनावर मात !
सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांना व त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीला जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे .
शिवसेना आमदार वैभव नाईक यांना २० जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती त्यापाठोपाठ त्यांची मुलगी, चुलत भाऊ, आणि खाजगी स्वीय सहायक यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते .
या सर्वांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिडं सेंटर मध्ये उपचार सुरू होते त्यांची तब्बेत असल्याचे पाहून आमदार वैभव नाईक व त्याच्या मुलीला सोमवारी ८ दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आले .
दरम्यान जिल्हा रुग्णालयामधील सर्व डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी यांनी चांगल्याप्रकारे उपचार केले आपण आमदार असलो तरी इतर रूग्णांचीही तेवढीच काळजी डॉक्टर घेत असल्याचे सांगून जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेबाबत आमदार वैभव नाईक यांनी समाधान व्यक्त केले .