corona virus : देवली येथील सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू, कोरोनाचा दुसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:59 IST2020-08-19T15:58:49+5:302020-08-19T15:59:56+5:30
मुंबई येथून देवली (मालवण) येथे आलेल्या एका कुटुंबातील १७ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्या मुलाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

corona virus : देवली येथील सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू, कोरोनाचा दुसरा बळी
मालवण : मुंबई येथून देवली (मालवण) येथे आलेल्या एका कुटुंबातील १७ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्या मुलाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची कोरोना तपासणी केली असता दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना जिल्हा रुग्णालयात (कोविड सेंटर) दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
४ आॅगस्ट रोजी मुंबई येथील ६ जणांचे कुटुंब मालवणातील खालची देवली येथील घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या १७ वर्षीय मुलाला त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्याच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला मधुमेह असल्याने त्यावरही उपचार सुरू होते.
मुलाची प्रकृती अधिक खालावली. त्यातच सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मालवण तालुक्यातील हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला. तळगाव येथील एका व्यक्तीचा याआधी कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
मालवण तालुक्यात आतापर्यंत ६२ कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यापैकी ३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २४ रुग्णांवर जिल्हा रुग्णालय व मालवण कुुंभारमाठ पॉलिटेक्निक येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कुबेर मिठारी यांनी दिली.