corona in sindhudurg -संस्थात्मक अलगीकरणातील दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:00 IST2020-05-25T12:59:16+5:302020-05-25T13:00:15+5:30
देवगड तालुक्यातील संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे . यातील एक पुरळ येथील असून दुसरी वृद्धा ही कालवी येथील संस्थात्मक अलगीकरणात होती . पुरळ येथील रुग्णाला कॅन्सर होता तो ऑपरेशन करूनच येथे आला होता.

corona in sindhudurg -संस्थात्मक अलगीकरणातील दोघांचा मृत्यू
सिंधदुर्ग : देवगड तालुक्यातील संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे . यातील एक पुरळ येथील असून दुसरी वृद्धा ही कालवी येथील संस्थात्मक अलगीकरणात होती. पुरळ येथील रुग्णाला कॅन्सर होता तो ऑपरेशन करूनच येथे आला होता.
त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचा पुतण्या त्याच्याबरोबर होता त्याला ओरोस येथे हलवण्यात आले आहे. मात्र त्याचा स्वाब निगेटिव्ह आला आहे. त्याला मधुमेहाचा त्रास असल्याने अद्यापही सोडण्यात आलेले नाही.
दुसरी महिला कालवी येथील असून तिचाही मृत्यू झाला आहे . तिचा मृत्यू दम्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . तिचा स्वाब घेण्यात आला आहे मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडून घाबरून जावू नये.