सावंतवाडीतील नगरपालिकेचे कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 19:02 IST2021-04-23T18:58:49+5:302021-04-23T19:02:05+5:30
CoronaVirus Sawantwadi Sindhudurg : सावंतवाडीतील नगरपालिकेतील एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सावंतवाडीतील नगरपालिकेचे कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह
सावंतवाडी: सावंतवाडीतील नगरपालिकेतील एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काल उशिरा या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. तर माणगाव येथील पीएचसीची नर्स देखील कोरोना बाधित आढळून आली आहे. सावंतवाडीतील एका अपार्टमेंटमध्ये ती वास्तव्यास होती.
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 799 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 131 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.