CoronaVirus Lockdown :पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:21 PM2020-03-30T18:21:47+5:302020-03-30T18:22:40+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार विविध ठिकाणी अडकले आहेत. परिणामी त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. मात्र, दोडामार्ग पोलीस आपल्या कर्तव्यात मग्न असताना अशांना सहाय्य करीत आहेत. विर्डी येथे धरणावर पुनर्वसनच्या कामासाठी आलेल्या मजूर कुटुंबांना त्यांनी जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

corona in kolhapur - The philosophy of humanity created by the police | CoronaVirus Lockdown :पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

CoronaVirus Lockdown :पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

Next
ठळक मुद्देपोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शनपुनर्वसनच्या कामासाठी आलेल्या मजूर कुटुंबांना जेवण

दोडामार्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार विविध ठिकाणी अडकले आहेत. परिणामी त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. मात्र, दोडामार्ग पोलीस आपल्या कर्तव्यात मग्न असताना अशांना सहाय्य करीत आहेत. विर्डी येथे धरणावर पुनर्वसनच्या कामासाठी आलेल्या मजूर कुटुंबांना त्यांनी जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

दोडामार्ग तालुक्यात विर्डी गावात धरण प्रकल्पाचे काम चालू आहे. त्यासाठी परप्रांतीय कामगारांची अनेक कुटुंबे धरणाच्या ठिकाणी आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात झालेल्या संचारबंदीमुळे सर्व वाहतूक ठप्प आहे. परिणामी परप्रांतातून कामानिमित्त आलेली अनेक कुटुंबे पराधीन झाली आहेत.

अशीच अवस्था दोडामार्ग येथील विर्डी धरणाचे काम करणाऱ्या परप्रांतीय कुटुंबाची झाली आहे. त्यांना अन्यधान्याचा तुटवडा झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेले आठ दिवस धान्याचा तुटवडा झाला. मात्र, त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यांची परिस्थिती जाणून घेऊन दोडामार्ग पोलिसांनी रविवारी त्यांची स्वखर्चाने जेवणाची सोय केली. धरणाच्या ठिकाणी जाऊन त्यांना जेवण दिले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.

यावेळी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बागल, सहायक पोलीस कुलदीप पाटील, कर्मचारी अनिल पाटील, स्वप्नील पंगम, सूरज ठाकूर, आदींनी सहकार्य केले. पोलिसांनी घडविलेल्या माणुसकीतून लोकांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे स्थानिकांतून त्यांचे आभार मानले जात आहेत.
 

Web Title: corona in kolhapur - The philosophy of humanity created by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.