शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, आंबेगाव-रुपणवाडीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:09 IST

आर्थिक परिस्थिती बेताची, कुटुंबाचा आधार हरपला

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेली पावसाची संततधार मंगळवारी कायम होती. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव-रुपणवाडी येथील पुलावरील पुराच्या पाण्यातून चालत जात असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने एकजण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रशांत चंद्रकांत दळवी (वय ३८) असे त्याचे नाव आहे.प्रशांत वाहून गेल्याची माहिती मिळताच आंबेगाव ग्रामस्थांसह पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्वरित शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली. पुढील दिवशी मंगळवारी सकाळी कुणकेरी येथील रवीचे भाटले येथे प्रशांत यांचा मृतदेह आढळून आला.सावंतवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या परिस्थितीतच रुपणवाडी येथील पुलावर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले होते. प्रशांत हा त्या पुलावरून जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी शरद लोहकरे, पोलिस कर्मचारी धोत्रे, सावंत आणि पोलिस हवालदार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

आर्थिक परिस्थिती बेताची, कुटुंबाचा आधार हरपलाप्रशांत दळवी यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. प्रशांत यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ आणि भाऊजी असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. प्रशांतच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हरपल्याने आंबेगाव आणि रुपणवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.