काँग्रेसचे संताजी, भाजपच्या सज्जन रावराणेंची निवड

By admin | Published: December 1, 2015 10:48 PM2015-12-01T22:48:10+5:302015-12-02T00:40:26+5:30

स्वीकृत नगरसेवक : चर्चेतील दावेदारांना ऐनवेळी डावलले

Congress's Santaji, BJP's gentleman Ravneen's choice | काँग्रेसचे संताजी, भाजपच्या सज्जन रावराणेंची निवड

काँग्रेसचे संताजी, भाजपच्या सज्जन रावराणेंची निवड

Next

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसचे संताजी अरविंद रावराणे तर भाजपचे सज्जन विनायक रावराणे यांची वर्णी लागली. या अनपेक्षित निवडींमुळे दोन्ही गटांच्या चर्चेतील दावेदारांना ऐनवेळी डावलण्यात आले. दरम्यान, नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांची सदस्यसंख्या आणि सदस्य यावेळी निश्चित करण्यात आले.
नगरपंचायतीच्या कार्यालयात उपजिल्हाधिकारी एस. आर. शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. सभेला प्रशासक तथा तहसीलदार जी. आर. गावीत, नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, उपनगराध्यक्ष संजय चव्हाण व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
स्वीकृत नगरसेवक पदांसाठी काँग्रेसच्या गटनेत्या संपदा शिवाजी राणे यांनी संताजी अरविंद रावराणे यांचे तर भाजपच्या गटनेत्या सरिता सज्जन रावराणे यांनी सज्जन विनायक रावराणे यांचे नाव सुचविले. त्यानुसार या रावराणे द्वयींच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करून ती वैध ठरविण्यात आली. सज्जन रावराणे महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे तर संताजी रावराणे श्री कुंभजाई एज्युकेशन सोसायटीचे संचालक असल्याने त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली आहे.
दुसऱ्या टप्प्यात विषय समित्या आणि समित्यांचे सदस्य निश्चित केले. त्यानुसार उपनगराध्यक्ष हे बाजार, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती असणार आहेत. तर सदस्यपदी शोभा उत्तम लसणे (काँग्रेस), समिता संतोष कुडाळकर (काँग्रेस), संतोष शंकर पवार (शिवसेना), संतोष शिवराम माईणकर (भाजप) यांची नावे निश्चित केली आहेत.
महिला व बालकल्याण समितीला सभापती आणि उपसभापती अशी दोन पदे असून या समितीसाठी दीपा दीपक गजोबार (काँग्रेस), सुप्रिया राजन तांबे (भाजप), समिता संतोष कुडाळकर (काँग्रेस), सुचित्रा रत्नाकर कदम (भाजप), सार्वजनिक बांधकाम, नियोजन, विकास व पर्यटन समिती:- संपदा शिवाजी राणे (काँग्रेस), उत्तम कौराजी मुरमुरे (काँग्रेस), स्वप्नील बाळकृष्ण इस्वलकर (काँग्रेस), रोहन जयेंद्र्र रावराणे (शिवसेना), रवीद्र्र श्रीधर तांबे (भाजप).
आरोग्य वीज शिक्षण व क्रीडा समिती : स्वप्नील बाळकृष्ण इस्वलकर (काँग्रेस), शोभा उत्तम लसणे (काँग्रेस), सरिता सज्जन रावराणे (भाजप), मनिषा गणेश मसूरकर (भाजप) याप्रमाणे समिती सदस्य निवडण्यात आले आहेत. या समित्यांची सभापती निवड येत्या आठवडाभरात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)



इच्छुकांमध्ये नाराजी
नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग पाचमधून संजय दिगंबर सावंत अपक्ष लढण्याच्या तयारीत होते. त्यांना थांबवण्यात आले. तसेच उमेदवारी दाखल केलेल्या डॉ. राजेंद्र पाताडे यांना ऐनवेळी माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे काँग्रेसकडून सावंत, पाताडे या द्वयींपैकी एकाची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे भाजपतर्फे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे आणि प्राध्यापक एन. व्ही. गवळी यांची नावे चर्चेत होती. त्यानुसार काँग्रेसकडून संजय सावंत व भाजपकडून प्राध्यापक एन. व्ही. गवळी यांची नावे आघाडीवर होती. मात्र, प्रत्यक्ष स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी दोन्ही गटांची चर्चेतील नावे डावलण्यात आली. त्यामुळे चर्चेतील इच्छुकांमध्ये नाराजी आहे.

Web Title: Congress's Santaji, BJP's gentleman Ravneen's choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.