जनतेचा विश्वासच शिवसेनेची ताकद

By Admin | Updated: November 23, 2014 23:54 IST2014-11-23T22:26:49+5:302014-11-23T23:54:33+5:30

शिवसेनेवर जो विश्वास दाखविला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी कोकणात आलो

The confidence of the people is the power of Shivsena | जनतेचा विश्वासच शिवसेनेची ताकद

जनतेचा विश्वासच शिवसेनेची ताकद

कुणकेश्वर : कोकण हे माझे घर आहे. कोकणातील जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेवर जो विश्वास दाखविला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी कोकणात आलो आहे. जनतेचा विश्वास, प्रेम हीच शिवसेनेची ताकद आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणकेश्वर येथे केले. या दौऱ्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. शिवसैनिकांशी सुसंवाद साधून जनतेचे प्रश्न जाणून घेणे एवढाच उद्देश असल्याचे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, रवींद्र फाटक आणि उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांचे देवगड तालुक्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सुरुवातीला दाभोळे पाटथर येथे सासुरवाडीला पाटणकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते कुणकेश्वराच्या दर्शनासाठी कुणकेश्वर येथे रवाना झाले. प्रथमच त्यांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर ट्रस्टच्यावतीने श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे रापण संघाच्यावतीनेही मच्छिमारांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांचा श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कातवण, मिठबांव, हिंदळे, मुणगे येथे उद्धव ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच या मार्गावर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
कुणकेश्वर येथे दत्ता दळवी, सुभाष मयेकर, गौरीशंकर खोत, अभय शिरसाट, कुणकेश्वर सरपंच दीपिका मुणगेकर, हेमंत करंगुटकर, शिवसेना शाखाप्रमुख पद्मनाभ कुणकेश्वरकर, श्रीकांत गावकर, श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर पेडणेकर, उपाध्यक्ष संजय वाळके, खजिनदार महेश ताम्हणकर, सदस्य रामदास तेजम तसेच मोठ्या
संख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)

उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक उपस्थित होते.

Web Title: The confidence of the people is the power of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.