संगणक परिचालकांचे वेंगुर्ल्यात धरणे, कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:07 PM2019-08-31T13:07:48+5:302019-08-31T13:09:37+5:30

आपले सरकार केंद्रात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात परिचालक म्हणून कायमस्वरुपी सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी पंचायत समिती वेंगुर्ला येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

Computer operators hold agitation in Vangurli: Demand for permanent accommodations | संगणक परिचालकांचे वेंगुर्ल्यात धरणे, कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी

संगणक परिचालकांचे वेंगुर्ल्यात धरणे, कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देसंगणक परिचालकांचे धरणे, वेंगुर्ल्यात आंदोलन कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी

वेंगुर्ला : आपले सरकार केंद्रात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात परिचालक म्हणून कायमस्वरुपी सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी पंचायत समिती वेंगुर्ला येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

गेल्या आठ वर्षांपासून आपले सरकार सेवा केंद्रामध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे कित्येक महिने मानधन मिळत नाही. शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी संगणक परिचालकांनी राज्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

या धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आयटी मंडळात सामावून घेऊन सर्व संगणक परिचालकांना यामध्ये कायमस्वरुपी नियुक्ती देणे, सर्व संगणक परिचालकांना राज्याच्या निधीतून किमान मासिक वेतन १५ हजार रुपये देणे, सर्व संगणक परिचालकांचे जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत वेतन मानधन देणे या मागण्यांसाठी सर्व संगणक परिचालक धरणे आंदोलन करीत आहेत.

या आंदोलनाला वेंगुर्ला पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, गटविकास अधिकारी उमा पाटील, विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गणेश  बागायतकर,  उपाध्यक्ष अनिल चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी तसेच तालुका समन्वयक गणेश अंधारी यांनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.

या धरणे आंदोलनात मयुरेश अंकुश मांजरेकर (ग्रामपंचायत आडेली), सुधाकर अनंत धोंड (ग्रामपंचायत वायंगणी-खानोली), रघुनाथ अनंत जुवाटकर (ग्रामपंचायत म्हापण), सुनीता रामदास आरोलकर (ग्रामपंचायत उभादांडा), अस्मिता अमित नाईक (ग्रामपंचायत होडावडा), वामन रघुवीर मडकईकर (ग्रामपंचायत केळुस), शांताराम नामदेव मुळीक (ग्रामपंचायत आसोली), योगिता सुरेश परब (ग्रामपंचायत शिरोडा), पूर्वा लक्ष्मण कांदे (ग्रामपंचायत वजराठ), रुपाली भिवा गावडे (ग्रामपंचायत मठ), दीप्ती उदय धुरी (ग्रामपंचायत वेतोरे), सुप्रिया सुधाकर ठुंबरे (ग्रामपंचायत तुळस), आरती सदाशिव पडते (ग्रामपंचायत मेढा), प्रियांका रंगनाथ केळुसकर (ग्रामपंचायत परबवाडा), पूजा हनुमंत वराडकर (ग्रामपंचायत मातोंड-पेंडूर) या परिचालकांनी सहभाग घेतला.


वेंगुर्ला येथे एक दिवसाच्या धरणे आंदोलनात संगणक परिचालक सहभागी झाले होते.

Web Title: Computer operators hold agitation in Vangurli: Demand for permanent accommodations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.