Complete Ganesh Chaturthi road work before flood: Kesarkar | गणेश चतुर्थीपूर्वी पूरग्रस्त भागातील  रस्त्याचे कामे पूर्ण करा : केसरकर
गणेश चतुर्थीपूर्वी पूरग्रस्त भागातील  रस्त्याचे कामे पूर्ण करा : केसरकर

ठळक मुद्देगणेश चतुर्थीपूर्वी पूरग्रस्त भागातील रस्त्याचे कामे पूर्ण करा : केसरकरशासकीय विश्रामगृहात पुर परस्थितीचा आढावा

सिंधुदुर्ग : पुरामुळे व अतिवृष्टीमेळे वाहून गेलेल्या व खराब झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने गणेश चतुर्थीच्या 4 दिवस अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पुर परस्थिती आढावा बैठकीवेळी पालकमंत्री केसरकर यांनी या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उप विभागीय अधिकारी कुडाळ, सावंतवाडी, आठ ही तालुक्यातील तहसिलदार, कार्यकारी अभियंता सावंतवाडी व कणकवली, लेखाधिकारी विकास पाटील, पत्तनचे कनिष्ठ अभियंता यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपसिथत होते.

जिल्हयातील उद्भवलेल्या अभूतपूर्व अशा पुर परिस्थितीमुळे नद्यांचे प्रवाह बदलल्याने नागरिकांचा नुकसान झाले असल्याचे सागूंन पालकमंत्री  केसरकर म्हणाले की, त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत. नदीने पात्र बदलल्यामुळे किती नुकसान झाले आहे त्याचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मधून देण्यात यावेत.

शिरशिंगे येथील गोठवेवाडीतील ग्रामस्थांचे पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करावे. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणी तहसिलदारांनी स्वतः पाहणी करावी तसेच पडलेल्या भेगा भरणे किंवा कसे याविषयी भूगर्भ तज्ज्ञांकडून अहवाल तयार करुन घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

जिल्ह्यातील पूर बाधित कुटुंबांना मदतीचे वाटप जवळ जवळ पूर्ण झाले असल्याचे सांगून ज्यांना मदत मिळणे बाकी आहे त्यांना तातडीने मदत पुरवावी, कृषिचे पंचनामे पूर्ण करुन त्याविषयी कार्यवाही करावी. पुरामुळे खंडीत झालेला वीज पूरवठा सुरळीत करावा. गणपती पूर्वी ही सर्व मदत पोहचेल असे पहावे. आपतकालीन यंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर करण्यात आला आहे. याविषयीची निविदा काढण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून आपत्तकालीन यंत्रणा तातडीने उभारतील असे पहावे अशा सूचना त्यांनी केल्या.
 

Web Title: Complete Ganesh Chaturthi road work before flood: Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.