शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान

By सुधीर राणे | Updated: October 6, 2023 13:04 IST

'संजय राऊत यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते'

कणकवली: महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेचा विषय झाला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. मात्र, खासदार संजय राऊत यांनी आमदारांना फोन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणून सांगा आणि आपले नाव पुढे केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांच्या घरातूनच उद्धव ठाकरेंचे नाव चालविले गेल्यानंतर हेच राऊत त्यांना कसे शिव्या घालत होते, याचे पुरावे आपल्याकडे आहेत. हिंमत असेल तर तारीख व ठिकाण ठरवून त्यांनी खुल्या व्यासपीठावर यावे, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिले आहे. आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धिमध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जे आयुष्यात कधीच खरे बोलले नाहीत, ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, फडणवीस यांनी अनेकांचा बुरखा फडण्याचे काम केले. मविआचे सरकार आले त्यावेळी संजय राऊत यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते. यासाठी एकनाथ शिंदे नको म्हणून त्यांनी आमदारांना फोन करून सांगायला सांगितले, त्यासाठी बैठकही बोलावली होती. मात्र चार पाचच आमदार आले होते. या साऱ्याचे पुरावे आपल्याकडे आहेत.  उद्धव ठाकरेंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवा, असे सांगत सिल्व्हर ओकमध्ये जाऊन कोण रडले हे सुद्धा आम्ही सांगू. संजय राऊत हे कायमच देश विरोधी भूमिका घेतात.  राऊत व ठाकरे शिवसेना यांना आपच्या संजय सिंगबद्दल सहानुभूती आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आता टीका केली जात आहे. मात्र, जेव्हा मविआमध्ये हे एकत्र होते तेव्हा ७० हजार कोटी दिसले नाहीत का? आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते त्यांनी आधी बघावे.आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात न केलेल्या कामांची चर्चा झाली पाहिजे. जे एकनाथ शिंदे यांना भेटतात त्या लोकांनी शिंदे व भाजपावर टीका करू नये. त्यांच्या काळात आरोग्य सेवा विस्कळीत होती. मात्र, आज सुधारणा होत आहे. कोविड काळात जेवढा खर्च दाखवला, तो झालाच नाही, असा आरोपही आमदार राणे यांनी यावेळी केला.तर काँग्रेसचे स्वतःचे आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. राज्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सक्षम आहेत असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरे