महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:34 IST2018-09-26T23:34:26+5:302018-09-26T23:34:30+5:30

महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या
मालवण : शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन युवतीने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय २०) असे युवतीचे नाव आहे. बाहेरून दुपारी घरी आलेल्या कुटुंबीयांना तिने आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हर्षदाचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी रुग्णालयात येत घटनेची माहिती घेतली. हर्षदा हिने आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास केला जाईल, असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय
हर्षदा ही येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे कळताच तिच्या भावाला मोठा धक्काच बसला. तिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट न झाल्याने या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.