शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
3
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
11
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
12
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
13
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

सिंधुदुर्ग : ऑनलाइन औषध विक्री बंद करा, तहसिलदाराना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:59 PM

ऑनलाइन औषध विक्री विरोधात औषध विक्रेता संघटनेच्यावतीने भारतभर मंगळवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत कणकवली तालुका केमिस्ट अड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने तहसीलदार संजय पावसकर याना निवेदन देण्यात आले. तसेच शासनाच्या धोरणाबाबत यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देऑनलाइन औषध विक्री बंद करा, तहसिलदाराना निवेदनकणकवली तालुका केमिस्ट असोसिएशनच्यावतीने मागणी

कणकवली :ऑनलाइन औषध विक्री विरोधात औषध विक्रेता संघटनेच्यावतीने भारतभर मंगळवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत कणकवली तालुका केमिस्ट अड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने तहसीलदार संजय पावसकर याना निवेदन देण्यात आले. तसेच शासनाच्या धोरणाबाबत यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.कणकवली तहसील कार्यालयात तहसिलदारांची भेट घेऊन त्याना निवेदन देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद उबाळे , तालुकाध्यक्ष संजय घाडीगावकर , तालुका सचिव अजित नष्टे, विजय घाडी, बाळासाहेब डोर्ले, विवेक आपटे, मकरंद घळसासी ,नंदू सावंत, योगेश रेडेकर, अभिनंदन डोर्ले, सोनाल साळगावकर, विनिता बुचडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाइन औषध विक्री समाजाच्या हिताची नसून त्यामुळे होणारे दुरुपयोग टाळण्यासाठी संघटनेच्यावतीने हे निवेदन देण्यात येत आहे . ऑनलाइन औषधांसाठी केंद्र शासन अनुमानित प्रस्तावित मसुदा घेऊन येत आहे . त्याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने कित्येक आंदोलने केली आहेत. ज्यामध्ये तीन वेळा भारत बंद मूक मोर्चा, ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही शासन त्याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही .चेन्नई तसेच दिल्ली उच्च न्यायालय यांनी ऑनलाइन औषधांची विक्री बंद करावी असा आदेश दिला होता .मात्र , शासनाने त्याचा गांभीर्याने विचार केलेला नाही. प्रस्तावित अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये संघटनेचे मत जाणून घेण्यात यावे , ज्यामुळे समाज हिताकडे दुर्लक्ष होणार नाही. अशी आमची मागणी आहे.

व्यवसायापेक्षा समाजहित जास्त महत्त्वाचे असून आम्हीही समाजाचे घटकच आहोत. ऑनलाइन औषधामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र त्याबाबत काहीच न झाल्याने देशभर मंगळवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :medicineऔषधंsindhudurgसिंधुदुर्ग