शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नाटळ येथील ग्रामसभेत हाणामारी; दोन गटातील सात जण जखमी

By सुधीर राणे | Updated: June 3, 2024 17:02 IST

जखमींवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

कणकवली : कणकवली तालुक्यातील नाटळ येथील ग्रामसभेमध्ये आज, सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास दोन गटातील शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीमध्ये एका गटाचे चार तर दुसऱ्या गटाचे तीन असे सातजण जखमी झाले आहेत. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नाटळ ग्रामपंचायत कार्यालयात  ग्रामसभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. ग्रामसभेत  दोन गटांमध्ये काही कारणांवरून शब्दीक बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटाच्या सदस्यांनी एकमेकांवर खुर्चा फेकून मारल्या तर काही जणांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. या राड्यात एका गटाचे ४ तर दुसऱ्या गटाचे ३ सदस्य जखमी झाले आहेत. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उद्धवसेनेचे कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह शिवसैनिक तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत,स्वप्नील चिंदरकर यांच्यासह कार्यकर्ते कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत जखमींकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक समशेर तडवी, उपनिरीक्षक सागर शिंदे,हवालदार मंगेश बावदाने,राज आघाव,विनोद चव्हाण आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही गटाच्या सदस्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली होती. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीgram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस