शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चौकुळ जुगारावरील छापा वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 31, 2015 01:28 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच चौकशी : प्राप्त रकमेपेक्षा कमी रक्कम दाखवली

सावंतवाडी : ओरोस येथील विशेष पोलीस पथकाने चौकुळ येथे टाकलेला छापा वादात सापडला आहे. या प्रकरणातील आरोपीने पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड घटनास्थळी मिळाली असताना ती ७७ हजार रुपयेच दाखविल्याची तक्रार थेट कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडे केली आहे. त्यांनी या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कणकवलीचे पोलीस अधीक्षक विजय खरात ही चौकशी करीत आहेत. हा छापा पोलीस उपअधीक्षक अनंत आरोस्कर यांच्यासह १२ पोलिसांनी टाकला होता. चौकुळ येथे ६ जुलैला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक अनंत आरोस्कर यांच्यासह १२ मुख्यालय पोलिसांनी जुगार अड्ड्यावर हा छापा टाकला होता. त्यात १५ आरोपींसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. यात ७७ हजार रुपयांची रोकड होती. मात्र, प्रत्यक्षात ही रोकड किमान पाच लाखांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ही रोकड दाखवली नव्हती. छापा टाकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच परस्पर ही रोकड काढून घेतल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणातील आरोपीने याची थेट पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडे तक्रार केली आहे. आरोपीने दोन लाख रुपयांची रोकड गाडीत ठेवली होती, त्यातील काही रक्कम पोलिसांनी काढून घेतल्याचा आरोप त्याने केला. या तक्रारीनंतर पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय श्ािंदे यांना दिले. त्यानुसार अधीक्षकांनी कणकवलीचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले आहे. त्यांनी चौकशीही सुरू केली आहे. ही चौकशी प्राथमिक स्वरूपाची असून, त्या चौकशीत पोलीस उपअधीक्षक अनंत आरोस्कर यांचाही समावेश आहे. सध्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले असून, काही कर्मचारी बाहेरगावी असल्याने त्यांचाही जबाब नोंदविण्यात येणार आहे. या प्राथमिक चौकशीचा अहवाल ते तत्काळ पोलीस अधीक्षकांना सोपविणार आहेत. याबाबत कणकवलीचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला. सध्या मी चौकशी करीत असून, त्याचा कालावधी मर्यादित नाही. मात्र, लवकरच हा अहवाल अधीक्षक दत्तात्रय श्ािंदे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीचे स्वरूप सांगण्यास त्यांनी नकार दिला. (प्रतिनिधी)