चिपी विमानतळाचा मुहूर्त ठरलेला नाही, 'ती' पत्रिका खोटी; उदय सामंत यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 19:59 IST2021-01-17T19:58:59+5:302021-01-17T19:59:45+5:30
चिपी विमानतळाच्या उदघाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. तरीही ३० जानेवारीपूर्वी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

चिपी विमानतळाचा मुहूर्त ठरलेला नाही, 'ती' पत्रिका खोटी; उदय सामंत यांची माहिती
चिपी विमानतळाच्या उदघाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. तरीही ३० जानेवारीपूर्वी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उदघाटन होणार असल्याची कार्यक्रम पत्रिका सोशल मीडियात व्हायरल झाली होती. पण अशी कोणतीही कार्यक्रम पत्रिता तयार करण्यात आलेली नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
"सोशल मीडियात व्हायरल झालेली निमंत्रण पत्रिका कुठून आली माहित नाही. याबाबत काहीच कल्पना नाही. तारीख अजून ठरलेली नाही. मी आणि स्थानिक खासदार या कार्यक्रम पत्रिकेबाबत अनभिज्ञ आहोत", असं उदय सामंत यांनी सांगितलं.
चिपी विमानतळाची केली पाहणी
दरम्यान, उदय सामंत यांनी चिपी विमानतळाच्या कामाची पाहणी यावेळी केली. कामाचा संपूर्ण आढावा सामंत यांनी घेतला. विमानतळाची बरीच काम अद्याप बाकी असून ती पुढील काही दिवसात पूर्ण केली जातील. त्यानंतर उदघाटनाची तारीख ठरवू, असं उदय सामंत यांनी सांगितलं.