शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

..अन् सिंधुदुर्गातील चिंदरमधील ग्रामस्थांनी सोडलं गाव, गाव झाला सुना सुना; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 13:00 IST

चिंदर ग्रामस्थ घरादाराला माडाच्या झावळ्या बांधून घराभोवती राख टाकून भरदूपारी उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते.

आचरा: तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशीर्वचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले आणि चिंदर ग्रामस्थ घरादाराला माडाच्या झावळ्या बांधून घराभोवती राख टाकून भरदूपारी उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. एका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव खाली होत होते.तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशि्र्वचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले. घरेबंद करुन दारावर झावळ्या बांधून घराभोवती राखेचे रिंगण घालून  भरदुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. गेली क्रित्येक वर्षे सुरु असलेल्याएका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव या विज्ञान युगातही खाली होत होते.कुणी खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून जात होते. गुरंढोरांसह कुणी धावतपळत जात होते. अवघ्या काही क्षणातच गजबजलेले चिंदर गाव शांत झाले होते. आणि आता गजबजाट वाढला होता तो वेशीबाहेर . आता तीन दिवस तीन रात्री गुराढोरांसह कोंबडी कुत्र्यांसह रानावनात एकमेकांच्या साथीने निसर्गाच्या साथीने एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेणार आहेत.दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी पळणीचे वर्ष आल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी श्री रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा एकदाच आणि एकच कौल प्रसाद घेतला जातो. त्रिसाली मर्यादा आली असून या वेळी गावपळण आणि देवपळण करण्यास तुझी परवानगी आसा काय?  अशी विचारणा  करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून पुरोहिताना विचारुन तारीख ठरवितात.

गावपळणी दिवशी चिंदरवासीयांनी शुक्रवार सकाळपासूनच गाव सोडण्याची सुरुवात केल्याचे दिसून येत होते. दुपारीच अडीच वाजण्याच्या सुमारास बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमल्यावर रवळनाथाला सांगणे करून शिवकळा वाढवली गेली. सुरक्षेचे शिवकळेचे आर्शिवचन घेतल्यानंतर ढोलाचा इशारा झाला आणि चिंदरवासीय वेशीबाहेर पळू लागले. ज्या भागातील लोकांना जी वेस जवळची होती, त्या भागात गेल्या आठ दिवसांपासून झटून रानावनात उभ्या करण्यात आलेल्या झोपड्यात आता नव्या संसाराची सुरुवात केली जात होती. काहींनी पाहुण्यांचा आधार घेतला होता.या गावात ख्रिश्‍चन धर्मीयही मोठ्या आनंदाने वेशीबाहेर हिंदू धर्मीयांच्या सोबत आनंदाने राहत असल्याचे दिसून येते होते. आता तीन दिवस तीन रात्री देवाच्या भरोश्‍यावरच रानावनात आभाळाच्या छताखाली एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेतला जाणार आहे.देवदीपावली दिवशी देवपळणतीन दिवसांत त्रिंबक येथील पावणाई मंदिरात दुपारी दोन वाजता बारा पाच मानकऱ्यांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. चौथ्या दिवशी न बोलता शांतपणे बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात एकत्र येत गाव भरण्याचा देवाचा हुकूम घेतात. तो सुद्धा एकदाच घेतला जातो. तो डावा झाल्यास पुन्हा पाचव्या दिवशी कौल प्रसाद घेतला जातो. गावपळणीनंतर येथे देवपळणही केली जाते. देवदिपावली दिवशी संध्याकाळी देवपळण होते. यात रवळनाथ मंदिरातून सहा तरंग घेणारे ज्यांना खांबधूरी म्हणतात ते तसेच बारापाच मानकरी हे तीन दिवस तीन रात्री साठी बस्की ब्राह्मण मंदिरात पळून जातात.विज्ञान युगातही परंपरा सुरुयाबाबत माहिती देताना मानकरी नारायण पाताडे सांगतात ,देवाचे आशिर्वचन झाल्यावर जापकरून गावपळणीला सुरुवात होते.  ग्रामस्थ शशिकांत नाटेकर यांनी गावपळण झाल्यावर दाराला माडाची झावळी बांधून घराभोवती राखेचे रिंगण घालून गाव सोडत असल्याचे सांगितले .तर भाई तावडे यांनी आम्ही तीन दिवस तीन रात्री भजन, फुगड्या, भेंड्या लावत मजेत आनंदाने वेळ घालवत असल्याचे सांगितले. एकूणच गेली शेकडो वर्षाची ही गावपळण परंपरा आजच्या विज्ञान युगातही सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग