शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मुख्यमंत्री किल्ले सिंधुदुर्गवर नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:39 PM

दोन दिवसांच्या कोकण दौ?्यावर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. किल्ले सिंधुदुर्ग येथे देशातील एकमेव अशा शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेत कुलस्वामिनी भवानी मातेच्या मंदिरात नतमस्तक झाले. मुख्यमंत्र्यांकडून जिरेटोपही मंदिराचे विश्वस्त सकपाळ यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री किल्ले सिंधुदुर्गवर नतमस्तककोकणातील बेरोजगार त्यांना दुवा देतील  : जठार यांचे आवाहन

मालवण : दोन दिवसांच्या कोकण दौ?्यावर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. किल्ले सिंधुदुर्ग येथे देशातील एकमेव अशा शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेत कुलस्वामिनी भवानी मातेच्या मंदिरात नतमस्तक झाले. मुख्यमंत्र्यांकडून जिरेटोपही मंदिराचे विश्वस्त सकपाळ यांच्याकडे प्रदान करण्यात आला.सिंधुदुर्गनगरी येथून हेलिकॉप्टरने मालवणात आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी, शहर अध्यक्ष बाबी जोगी, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब व शिवसेना पदाधिकारी यांनी स्वागत केले. त्यानंतर मालवण बंदर जेटी येथून प्रवासी बोटीतून समुद्रमार्गे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी ११ : ४५ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे दाखल झाले.किल्ले सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री ठाकरे यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पस सदस्य मधुरा चोपडेकर, वायरी सरपंच घनश्याम ढोके, उपसरपंच संदेश तळगावकर, व सदस्य, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, रुची राऊत, अतुल रावराणे, हर्षद गावडे, मंदार गावडे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी ठाकरे यांना स्थानिकांनी शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.मुख्यमंत्र्याच्या दौ?्याच्या पार्श्वभूमीवर बोर्डिंग मैदान ते मालवण जेटी या मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पर्यटकांसाठी सकाळपासून किल्ले दर्शन तसेच पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाचा दौरा आटोपल्यानंतर पर्यटकांसाठी किल्ले दर्शन सेवा सुरू करून देण्यात आली. दरम्यान, हेलिकॉप्टरने बोर्डिंग मैदानावर उतरलेल्या मुख्यमंत्र्यांनी लगतच्या सीताबाई श्रीपाद घुर्ये नर्सरीतील चिमुकल्यांशी संवाद साधला.मच्छिमारांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारलेमालवण बंदर जेटी येथे मच्छीमार नेते महेंद्र पराडकर व अन्य मच्छीमार प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत निवेदन सादर केले. मत्स्यदुष्काळाचा गांभीयार्ने विचार व्हावा. मच्छीमारांची कर्जे माफ व्हावीत. मच्छीमार आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत. पर्ससीन व एलईडी मासेमारी बाबत अधिसूचनांची कठोर अंमलबजावणी व्हावी. यासह अन्य मागण्या मच्छीमारांनी केल्या. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्गFortगड