शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

छत्रपतींची शिवलंका जाहली ‘शिवमय’ : नीतेश राणेंनी अर्पण केली शिवप्रतिकृती, पद व हस्त चिन्ह-शिवप्रेमींची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 7:21 PM

मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, शिवशाही गाणी, पोवाडे, भगवे फेटे, झेंडे, मर्दानी खेळ तसेच शिवज्योत मशालींनी

मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, शिवशाही गाणी, पोवाडे, भगवे फेटे, झेंडे, मर्दानी खेळ तसेच शिवज्योत मशालींनी आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण किल्ला तसेच मालवणनगरी शिवमय झाली. सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात आमदार नीतेश राणे यांनी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करीत शिवप्रतिकृती, पद व हस्त चिन्ह अर्पण केले.

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर अखिल भारतीय शिवछत्रपती जन्मोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती व शिवजन्मोत्सव सोहळा शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत, सचिन तोडकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाळू कोळंबकर, मोहन वराडकर, नगरसेवक यतिन खोत, सुदेश आचरेकर, मिलिंद मेस्त्री, मेघा गांगण, चारुशिला आचरेकर, शिल्पा खोत, वैशाली शंकरदास, ममता खानोलकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, अभय कदम यांच्यासह शेकडो शिवप्रेमी,

महिलांनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.यावेळी मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ यांच्यासह अन्य किल्ला रहिवाशांचा आमदार राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आमचे सर्वस्व आहेत. त्यामुळे महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगणारी विकृती शिवभक्तांनी हाणून पाडायला हवी.  शिवभक्त, शिवप्रेमींची व्याख्या बदलत चालली आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांना नावे ठेवणाºयाना आजकाल शिवभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.महाराजांचा खोटा इतिहास पुढे आणणाºयांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले जाते, अशी शोकांतिका आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केली. महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर कोणत्याही कायद्याची पर्वा न करता त्याला तेथेच शिक्षा करण्याचे काम शिवभक्तांनी करायला हवे, असे ते यावेळी उपस्थितांना म्हणाले.

महाराजांचे विचार आत्मसात करा!नीतेश राणे म्हणाले,  शिवाजी महाराज, जिजाऊ माता, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्याबद्दल विकृत लिखाण, इतिहास सांगितला जात आहे. चुकीचा इतिहास सांगून शिवसृष्टी बनण्याचा प्रकार राज्यात होत आहे. चुकीचा इतिहास सांगून काहीजण स्वत:ला शिवभक्त म्हणवित आहे. यामुळे सर्व शिवभक्तांनी अंगात कडवटपणा आणण्याची गरज निर्माण झाली आहे. कुठल्याही कायद्याची तमा न बाळगता आपल्या महापुरुषाची अशी बदनामी होऊ न देता महाराजांचे विचार शिवभक्तांनी आत्मसात करायला पाहिजेत.

मंदिर सुशोभिकरणात योगदान देणारशिवराजेश्वर मंदिर हा अमूल्य ठेवा आहे. किल्ल्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी नारायण राणे, निलेश राणे यांचे योगदान राहिले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या महाराष्ट्रात आमदार, खासदार म्हणून न वावरता महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही वावरत आहोत. महाराजांचे विचार, गडकिल्ले यांना आम्ही कशी ताकद देऊ शकतो यासाठी दिवसरात्र मेहनत करणार आहोत. किल्ला सुशोभिकरणासाठी ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्याची जबाबदारी मी स्वत: घेत आहे.जो शिवभक्त असतो तो आपल्यापरीने योगदान देत असतो. ते योगदान आम्हीही देऊ, असे आश्वासन यावेळी नीतेश राणे यांनी दिले.पोवाड्यांच्या माध्यमातून शिवगीते सादरशिवजयंतीनिमित्त कोल्हापूरच्या मावळ्यांनी मंदिरात फुलांची आरास केली होती. मंदिर परिसरात लक्षवेधक रांगोळी रेखाटण्यात आली होती. तर पोवाड्यांच्या माध्यमातून शिवगीते सादर करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivjayantiशिवजयंती