अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ बदलावी : दळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 05:35 PM2021-06-02T17:35:37+5:302021-06-02T17:37:05+5:30

CoronaVIrus Sindhudurg Ncp : सध्या सकाळी ७ ते ११ ही अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ ही कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

Change the running hours of essential service shops: Dalvi | अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ बदलावी : दळवी

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ बदलावी : दळवी

Next
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ बदलावी : दळवीसकाळी १० ते ११ या वेळेत होते बाजारात गर्दी

सावंतवाडी : सध्या सकाळी ७ ते ११ ही अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ ही कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

दळवी यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्याची ७ ते ११ ही वेळ कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांना वाहतुकीची सोय नसल्याने सकाळी लवकर येणे शक्य होत नाही. त्यामुळे सकाळी १० ते ११ या वेळेत बाजारात गर्दी होते.

त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करणे शक्य होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनीदेखील योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून गर्दी टाळत कोरोनाची चेन तोडता येईल, अशी आशा दळवी यांनी व्यक्त केली. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी तसेच राजकीय नेत्यांशी आपण चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Change the running hours of essential service shops: Dalvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.