शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

MSRTC Ticket Price Hike: कणकवलीत उद्धवसेनेचे चक्काजाम आंदोलन, एसटी बसेस धरल्या रोखून

By सुधीर राणे | Updated: January 30, 2025 13:48 IST

ST Bus Ticket Fare Hike Protest: एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात उद्धवसेनेच्यावतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

कणकवली : एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात उद्धवसेनेच्यावतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा मोठे आंदोलन करू असा इशारा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह उपस्थित नेत्यांनी दिला. यावेळी एसटीचे वाहतूक अधिकारी निलेश लाड यांच्याशी चर्चा करण्यात आली. एसटी प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कणकवली बसस्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करावी. यासह अन्य प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या. यावेळी या आंदोलनातील मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची ग्वाही लाड यांनी दिली. बसस्थानकामधून बाहेर जाणाऱ्या एसटी रोखून धरत काहीवेळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांना त्याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याच्या बॉटल देखील वाटण्यात आल्या. जर प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नसतील व बसस्थानकामध्ये सोयी सुविधा नसतील तर तिकीट दरवाढीचे कारण काय?  भाडेवाढीच्या नावाखाली महायुती सरकार जनतेला व प्रवाशांना वेठीस धरत असून या सरकारचा निषेध करत असल्याचेही यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर आदी पदाधिकाऱ्यासह शिवसैनिक उपस्थित होते. एसटीचे वाहतूक निरीक्षक प्रदीप परब, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड आदी अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेagitationआंदोलन