तळेरे येथे जैवविविधता दिन बीजारोपण करून साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:46 PM2021-05-24T19:46:51+5:302021-05-24T19:48:18+5:30

environment Sindhudurg : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या अनुषंगाने तळेरे येथील निसर्ग मित्र परिवार या पर्यावरणप्रेमी संस्थेच्यावतीने श्री देव गांगेश्वर मंदिर परिसरातील देवराईमध्ये आंबा, काजू, जांभूळ, फणस अशा विविध वृक्षांचे बीजारोपण करण्यात आले.  निसर्ग मित्र परिवार यांच्यावतीने नेहमीच निसर्गाशी संबंधित उपक्रम राबविले जातात.

Celebrate Biodiversity Day by sowing seeds at Talere | तळेरे येथे जैवविविधता दिन बीजारोपण करून साजरा

तळेरे येथे जैवविविधता दिन बीजारोपण करून साजरा

Next
ठळक मुद्देतळेरे येथे जैवविविधता दिन बीजारोपण करून साजराआंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने उपक्रमाची सुरुवात

तळेरे : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या अनुषंगाने तळेरे येथील निसर्ग मित्र परिवार या पर्यावरणप्रेमी संस्थेच्यावतीने श्री देव गांगेश्वर मंदिर परिसरातील देवराईमध्ये आंबा, काजू, जांभूळ, फणस अशा विविध वृक्षांचे बीजारोपण करण्यात आले.  निसर्ग मित्र परिवार यांच्यावतीने नेहमीच निसर्गाशी संबंधित उपक्रम राबविले जातात.

मागील वर्षापासून लॉकडाऊन असल्याने सध्या कोणताही मोठ्या प्रमाणावरील उपक्रम हाती घेण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमात निसर्ग मित्र परिवाराचे सल्लागार शशांक तळेकर, अशोक तळेकर, अध्यक्ष संजय खानविलकर, सचिव राजेश जाधव, निलेश तळेकर, संतोष तळेकर, सदा तळेकर, सोहनी आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे १०० हून अधिक विविध वृक्षांच्या बीजांचे रोपण करण्यात आले.

Web Title: Celebrate Biodiversity Day by sowing seeds at Talere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.