शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील उड्डाणपुलाला लटकलेले पत्रे धोकादायक, आमदार नितेश राणेंनी तातडीने केल्या सूचना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 1, 2022 14:12 IST

हे पत्रे लोकांच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवितहानी होण्याची भीती

कणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली शहरातील पेट्रोल पंपा समोरील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या खालील भागात ब्रिजच्या पृष्ठभागावर स्लॅबच्या ठिकाणी काम करत असताना अनेक जागांवर लोखंडी पत्रे सध्या वरतीच अडकून राहिलेले आहेत. हे पत्रे लोकांच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवितहानी होण्याची भीती आहे. याबाबतची वस्तुस्थिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर आमदार नितेश आणि प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या समक्ष सदर पत्रे हटविण्याबाबत सूचना केल्या.फ्लाय ओव्हर ब्रिजवरील पाणी पाईपद्वारे पिलर जवळ पडण्याची गरज आहे. परंतु हे पाणी सर्विस रस्त्यांवर धबधब्या सदृश्य पडत असल्याने पादचारी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वारंवार लक्ष वेधून ही महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. याकडे देखील नलावडे यांनी राणे यांचे लक्ष वेधले. त्यामुळे यासंदर्भात महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने दखल घ्यायला भाग पाडा अशी मागणीही नलावडे यांनी केली.दरम्यान आमदार राणे यांनी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांना तातडीने सूचना करत येथील धोकादायक पत्र्याचा स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो देखील घेतला. कणकवली शहरात असे चार ते पाच ठिकाणी पत्रे अडकलेल्या स्थितीत असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या संबंधितांना सूचना द्या असेही अधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Kankavliकणकवली