शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Sindhudurg: 'सायबानू काय ता करा; पण हत्तींका धरा ', हत्तीआपद्ग्रस्तांची उपवनसंरक्षकांना आर्त साद

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 3, 2024 18:45 IST

हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रात नेण्यासाठी मोहीम

वैभव साळकरदोडामार्ग : सायबानू काय ता करा; पण हत्तींका धरा, अशी आर्त विनवणी केर-मोर्ले परिसरातील हत्तीआपदग्रस्तांनी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांना केली. मंगळवारी त्यांनी वनाधिकाऱ्यांसह हत्तीनुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांनीही आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तर रेड्डी यांनी तुमची मागणी शासनापर्यंत पोहोच; पण त्याचबरोबर तुमच्या मागण्यांबाबत काय पाठपुरावा केला हे दर पंधरा दिवसांनी तुम्हाला वनाधिकारी गावात येऊन कळवतील, असे आश्वासन दिले.यावेळी त्यांच्यासमवेत दोडामार्ग वनक्षेत्रपाल व्ही.एस. मंडल, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी हत्ती पकड या प्रमुख मोहिमेसह शेतकरी विमा, पंचनामा क्लिष्ट बाबी, वाढीव नुकसानभरपाई, समाविष्ट नसलेली पिके, शेतकरी शेतीत जात नसल्याने होणारे नुकसान, प्रतिकुटुंब अनुदान, सोलार- पथदीप, लघुउद्योग निर्मिती, फळबाग लागवड अनुदान यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

वन विभागाने सातत्य ठेवावेउपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी थेट शेती नुकसानीपर्यंत पोहोचण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, यात सातत्य ठेवून जेव्हा वन विभाग शेतकऱ्यांच्या मागण्याचा पाठपुरावा करून दिलासा देईल त्याचवेळी आमचे खरे समाधान होईल, अशी भावना व्यक्त केली.

हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रात नेण्यासाठी मोहीमसध्या हत्ती गावठाण क्षेत्रात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली. रेड्डी यांनी हे अंतरही पाहिले. ग्रामस्थांनी हत्तींना तिलारी बुडीत क्षेत्रापर्यंत न्या, अशी मागणी केली. त्याला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मात्र, पावसाळी हंगामातील अडचणीवर चर्चेअंती पाऊस कमी झाल्यावर याबाबतीत निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीforest departmentवनविभाग