शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हेनेझुएलासारखी परिस्थिती भारतातही उद्भवू शकते'; अमेरिकेच्या कारवाईवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठे विधान
2
ईपीएफओ पेन्शनधारकांचे अच्छे दिन! किमान पेन्शनमध्ये ५ पटीने वाढ होण्याची शक्यता
3
ना एशियन पेंट्स, ना बर्जर! राष्ट्रपती भवन ते हावडा ब्रिजपर्यंत सगळे रंगवले; 'ही' आहे सर्वात जुनी कंपनी
4
'मोदी-शाह की कब्र...' JNU मध्ये विद्यार्थ्यांची वादग्रस्त घोषणाबाजी; भाजपचा जोरदार पलटवार...
5
ट्यूशनवरून परतणाऱ्या मुलींचा पाठलाग आणि अश्लील कमेंट्स; कुठे घडला 'हा' संतापजनक प्रकार?
6
"तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील"; आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावले
7
सगळं असूनही मन अस्वस्थ का? मी आनंदी का नाही? वाचा चाळीशीनंतर पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं!
8
६ महिन्यांमध्ये १ लाखांचे केले ४ लाख; आजही जोरदार वाढ, कंडोम तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये का आली तेजी?
9
भारतीयांसाठी 'लॉटरी'! १ लाख रुपयांचे होतील ७५ लाख; दक्षिण अमेरिकेतील 'या' देशात राजेशाही थाटात जगाल
10
व्हेनेजुएलातील तेलाने अमेरिका मालामाल होणार; पाकिस्तानच्या GDP पेक्षा 30 पट अन् भारताच्या...
11
Mustafizur Rahman: आयपीएलमधून बाहेर झालेल्या मुस्तफिजूर रहमानला ९.२० कोटी मिळतील का? जाणून घ्या नियम!
12
VIDEO: ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाला अपघात, अभिवादन करत असताना सनरूफवर आदळले, छातीत दुखू लागले, प्रकृतीबाबत येतेय अशी माहिती
13
कोण आहे Aman Rao Perala? IPL लिलावात फक्त ३० लाख मिळालेल्या २१ वर्षीय पठ्ठ्यानं द्विशतकासह रचला इतिहास
14
Nashik Municipal Election 2026 : कोण म्हणे धनिकांना, उमेदवारी दिली कामगाराला; धक्का बसला कार्यकर्त्याला
15
एका झटक्यात चांदीच्या किमतीत ७७२५ रुपयांची तेजी, सोन्याच्या दरातही मोठी वाढ; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट दर
16
WhatsApp भाड्याने द्या अन् बक्कळ कमवा, कमिशनचं आमिष; नव्या सायबर फ्रॉडपासून सावधान
17
लग्नानंतर पहिल्याच रात्री धक्का; टक्कल लपवणाऱ्या पतीचे सत्य उघड, पत्नीचा मोठा निर्णय
18
शुक्र गोचर २०२६: शनीच्या राशीत शुक्राचा प्रवेश; 'या' राशींच्या नशिबात संक्रांतीपूर्वीच मोठा धमाका!
19
"असं कोण बोलतं का?", 'बिग बॉस मराठी ५'मध्ये स्पर्धकावर रागावल्यानंतर रितेशने खालेल्ला आईसाहेबांचा ओरडा
20
सोनिया गांधी यांची अचानक प्रकृती खालावली, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात केले दाखल
Daily Top 2Weekly Top 5

काजू उद्योगाला जीएसटी परतावा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:49 IST

काजू उद्योगाला जीएसटी परतावा देण्याबाबत तसेच काजूबोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनावरील (फेणीला) शुल्क कर सवलत देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय त्वरित घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जीएसटी कमिशनसमोर घेतलेल्या बैठकीअंती महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्देकाजू उद्योगाला जीएसटी परतावा मिळणारमहाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनने वेधले मंत्र्यांचे लक्ष

वेंगुर्ला : काजू उद्योगाला जीएसटी परतावा देण्याबाबत तसेच काजूबोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनावरील (फेणीला) शुल्क कर सवलत देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय त्वरित घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जीएसटी कमिशनसमोर घेतलेल्या बैठकीअंती महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष सुरेश बोवलेकर, उपाध्यक्ष भास्कर कामत, सचिव बिपीन वरसकर व दयानंद काणेकर यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसार्इंची भेट घेऊन काजू उद्योजकांना जीएसटी परतावा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली होती.त्यानुसार मंत्री देसाई यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून लक्ष वेधण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तेथेच जीएसटी कमिशनरांची बैठक ते आयोजित करतील व न्याय देतील, असे सांगितले होते.यानुसार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जीएसटी कमिशनर यांच्यासमोर महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे पदाधिकारी सुरेश बोवलेकर, भास्कर कामत, बिपीन वरसकर व दयानंद काणेकर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत काजू दरावरील जीएसटी परतावा व काजू बोंडावरील उत्पादक शुल्क कर (एक्साईज ड्युटी) कमी करण्याबाबत चर्चा होऊन लवकरच निर्णय घेण्यातयेईल, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.कोकणांतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक राहिलो असून काजू उत्पादक शेतकरी कोकणच्या विकासांत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आपले नेहमी सहकार्य राहील, असेही पवार यांनी यावेळी या शिष्टमंडळास सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारsindhudurgसिंधुदुर्ग