शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर अपघात झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करा : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 16:09 IST

यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास व त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक सभागृहामध्ये खनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षे विषयी आयोजित बैठकीमध्ये त्यांनी या सूचना केल्या.

ठळक मुद्देमहामार्गावर अपघात झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करा :पालकमंत्री दीपक केसरकरखनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षे विषयी बैठकीमध्ये सूचना

सिंधुदुर्गनगरी : यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास व त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक सभागृहामध्ये खनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षे विषयी आयोजित बैठकीमध्ये त्यांनी या सूचना केल्या.            यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर,  जिल्हा खनिकर्म अधिकारी, महामार्गा ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, सर्व विभागांचे अधिकारी, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महामार्गाच्या कामामुळे व खनिज उत्खननामुळे बाधीत झालेल्या गावातील ग्रामस्थ, पाणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.   सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथे झालेल्या गौण खनिजाच्या उत्खननाचे सर्वेक्षण करावे अशा सूचना देऊन पालकमंत्री पुढे म्हणाले की, नियमबाह्य उत्खननावर कशा प्रकारे कारवाई करता येईल याविषयी जिल्हा खनिकर्म विभागाने प्रस्ताव सादर करावा. उत्खननासाठीच्या परवानग्या आणि मर्यादा याची सविस्तर माहिती देण्यात यावी. खाणकाम करणाऱ्या कंपनीने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ताबडतोब करावी, पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून तो पर्यावरण विभागामार्फत सादर करावा.

हामार्गाचे काम सुरुळीत चालू रहावी ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. ठेकेदाराने डायव्हर्शनचे बोर्ड योग्य प्रकारे लावून महामार्गावर अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महामार्गावर होणाऱ्या अपघातास ठेकेदारास जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. गेल्यावर्षी पावसाळ्यात महामार्गासाठी टाकलेल्या भरावाची माती रस्त्यावर येऊन चिखल झाल्याने अनेक अपघात झाले व त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. यंदाच्या वर्षी असा एकही प्रकार होणार नाही. महामार्गावर माती येणार नाही याची ठेकेदाराने दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.            यावेळी पालकमंत्री यांनी ब्लास्टिंगमुळे घरांना तडे गेलेल्या सोनुर्ले येथील बाधीत कुटुंबांचे म्हणणे जाणून घेतले व त्यानुसार संपूर्ण खाणकामाचा पुन्हा सर्वे करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग