कारची झाडाला धडक; चालक जखमी

By Admin | Updated: May 27, 2014 01:17 IST2014-05-27T01:17:20+5:302014-05-27T01:17:43+5:30

महामार्गावर ओरोस खर्येवाडी येथील घटना

Car tree hit; Driver injured | कारची झाडाला धडक; चालक जखमी

कारची झाडाला धडक; चालक जखमी

ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस खर्येवाडी पॅट्रोल पंपासमोरील झाडाला शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मारूती स्विफ्ट डिझायर कार झाडावर जाऊन आदळली. ओरोस खर्येवाडी येथे मुंबई ते कुडाळ प्रवास करणार्‍या मारूती स्विफ्ट डिझायर कारला अपघात होऊन चालक दिपक दत्ताराम पाटील हे जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी कुडाळच्या दिशेने येत असताना झाडाला जाऊन आदळली. ही खबर विनायक मोहन केरकर (वय ३०, रा. भांडूप) यांनी दिली. या गाडीतील शिवा सटू केरकर, रामदास दत्ताराम केरकर, गुरूनाथ बाबाजी केरकर आदी प्रवासी जखमी झाले आहेत. ते किरकोळ जखमी झाल्यामुळे ओरोस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केरकर कुटुंबीय पाहुण्यांच्या लग्नसमारंभासाठी कुडाळकडे येत होते. अधिक तपास ओरोस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अ‍े. एस. काळे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Car tree hit; Driver injured