आंबोली घाटात कारला अपघात, दरीत कोसळली : सुदैवाने चालक बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:15 PM2020-09-05T16:15:13+5:302020-09-05T16:16:26+5:30

कोल्हापूरहुन गोव्याला जाणाऱ्या कारला गुरूवारी मध्यरात्री आंबोली घाटात नानापाणी येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दरीच्या दिशेने कोसळली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली.

Car crashes in Amboli Ghat, crashes into valley: Luckily driver escapes | आंबोली घाटात कारला अपघात, दरीत कोसळली : सुदैवाने चालक बचावला

आंबोली घाटात कारला अपघात, दरीत कोसळली : सुदैवाने चालक बचावला

Next
ठळक मुद्देआंबोली घाटात कारला अपघात, दरीत कोसळली सुदैवाने चालक बचावला

सावंतवाडी : कोल्हापूरहुन गोव्याला जाणाऱ्या कारला गुरूवारी मध्यरात्री आंबोली घाटात नानापाणी येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दरीच्या दिशेने कोसळली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली.

कोल्हापूरहुन कार गोव्याला निघाली होती. ती गुरूवारी मध्यरात्री आंबोली घाटात नाना पाणीच्या वरच्या बाजूला आली असता अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दरीच्या दिशेने कोसळून झाडावर आदळली.

अपघात मोठा असल्याने या अपघातात संपूर्ण गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने गाडीत फक्त चालक असल्याने तो या अपघातात बालंबाल बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

Web Title: Car crashes in Amboli Ghat, crashes into valley: Luckily driver escapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.