शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
2
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
3
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
4
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
5
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
6
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
7
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
8
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
9
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
10
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
11
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
12
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
13
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
14
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
15
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
16
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
17
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
18
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
19
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
20
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
Daily Top 2Weekly Top 5

वायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणा, मात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:42 IST

शेतकरी जर स्वेच्छेने जमीन देत असतील तरच आम्ही मालवण तालुक्यातील तोंडवली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प केला असता. पण शेतकऱ्यांची जबरदस्ती जमीन सरकार घेणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणीतून हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटन विभागाने घेतल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई येथे लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देवायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणामात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार लोकमतशी खास संवाद

अनंत जाधवसावंतवाडी : शेतकरी जर स्वेच्छेने जमीन देत असतील तरच आम्ही मालवण तालुक्यातील तोंडवली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प केला असता. पण शेतकऱ्यांची जबरदस्ती जमीन सरकार घेणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणीतून हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटन विभागाने घेतल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई येथे लोकमतशी बोलताना केली.

सरकारकडे नव्या जागांचे प्रस्ताव आले आहेत. त्यावर अभ्यास सुरू असल्याचेही यावेळी मंत्री रावल म्हणाले. समुद्रातील विश्व पर्यटकांसाठी खुले होणार असून, हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये राबविण्यात येणार आहे, असे यावेळी मंत्री रावल म्हणाले. सिंधुदुर्गातील प्रकल्पाबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी विविध विषयावर चर्चा झाली.यावेळी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा आम्हाला पर्यटनातील मॉडेल बनवायचे आहे. त्यामुळे राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. १९९५ मध्ये सिंधुदुर्गमध्ये तीन पंचतारांकित हॉटेल प्रकल्प आले होते. त्यातील एका पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प हा पूर्ण झाला आहे. तर ताज या पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तर तिसरे हॉटेल हे पर्यटन विभागाने उभे केले आहे. ही तीनही हॉटेल पूर्ण होतील तेव्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गमध्ये येतील, असे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणी येथे करण्यासाठी शासन आग्रही होते. पण तेथील शेतकरी जमिनी देण्यास इच्छुक नाहीत. शेतकरी जर स्वेच्छेने जमिनी देण्यास तयार नसतील तर आम्ही जमिनी हिसकावून घेऊन प्रकल्प करणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प या जागेवरून हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे यावेळी मंत्री रावल यांनी जाहीर केले आहे.

नवीन जागा अद्याप निश्चित झाली नाही. सरकारकडे तीन ते चार प्रस्ताव आले आहेत. त्यावर विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी शंभर कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. पण हा निधी आम्ही शासनाला परत दिला आहे. जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा शासन तो निधी देईल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला प्रकल्प अंडर ग्राऊंड ग्लास समरीचा म्हणजेच पाण्यातील विश्व हे पर्यटकांना बघता येणार आहे. त्यासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण हा प्रकल्प कुठे करायचा हे निश्चित झाले नाही. मात्र या प्रकल्पामुळे अधिकाधिक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने नवे धोरणपर्यटन विभाग स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी एक नवीन धोरण आणणार असून, यात स्थानिकांना कॉटेजीस बांधून दिले जाणार आहेत. यात पर्यटक राहतील. ही कॉटेजीस घराच्या समोर बांधून दिली जाणार आहेत. यासाठी जागतिक कंपनीशी चर्चा सुरू असल्याचेही यावेळी पर्यटनमंत्री रावल यांनी सांगितले.

टॅग्स :Jaykumar Rawalजयकुमार रावलDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग