३४ दिवसांनी धावली ओरोस मार्गावर बसफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 19:27 IST2021-12-13T19:24:53+5:302021-12-13T19:27:29+5:30
सकाळी ९. ४५ वाजता मालवण कट्टा ओरोस ही बसफेरी सोडण्यात आली.

३४ दिवसांनी धावली ओरोस मार्गावर बसफेरी
मालवण : एसटी कर्मचारी यांचा संप सुरू असताना ३४ दिवसानंतर येथील आगारातून सोमवारी सकाळी ९. ४५ वाजता मालवण कट्टा ओरोस ही बसफेरी सोडण्यात आली, अशी माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.
दुपारी १ वाजता मालवण कसाल, ओरोस ही गाडी सोडण्यात आली. मंगळवारपासून सकाळी ९. ०५ वाजता ओरोस बस सुटणार आहे, असे बोवलेकर यांनी सांगितले. यावेळी उदय खरात, अमोल कामते, प्रसाद बांदेकर, ए. जी. वाघमारे, जी. वाय. गोळवणकर, एसटी चालक ए. जे. भोगवेकर, वाहक एम. एन. आंबेसकर आदी उपस्थित होते.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हा असे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार येथील आगारात वाहक, चालक व मेकॅनिक असे तीन कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. इतरही कर्मचाऱ्यांनी हजर व्हावे असे आवाहन आगारप्रमुख बोवलेकर यांनी केले आहे.