शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

sindhudurg crime: वायंगणी-तोंडवळीतील 'तो' जळीत मृतदेह पुण्यातील तरुणाचा, 'अशी' पटली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 18:38 IST

डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह नेमका कोणाचा हे स्पष्ट होणार

आचरा : वायंगणी-तोंडवळी माळरानावर सोमवारी आढळून आलेल्या ‘त्या’ जळीत मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रीतेश मधुकर ताम्हणकर (४०, रा. पुणे) असे त्या तरुणाचे नाव असून, त्याच्या हातातील अंगठीवरून त्याची पत्नी प्रीती ताम्हणकर यांनी ओळखल्याचे आचरा पोलिसांनी सांगितले. कर्जबाजारीपणा आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या पत्रावरून प्रीतेश याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.तोंडवळी-वायंगणी सडा परिसरात शनिवारी सकाळी एका झाडाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न आणि जळालेल्या अवस्थेत दिसून आला होता. मृतदेहापासून काही अंतरावर आधार कार्डचे लॅमिनेशन केलेला कागद पोलिसांना सापडून आला होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला असता पुणे येथून ताम्हणकर नामक तरुण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.  वायंगणी सडा येथे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच प्रीतेश याची पत्नी व नातेवाईक मालवणात दाखल झाले. मृतदेहाच्या हातात असलेल्या अंगठी तसेच अन्य वस्तूंच्या आधारे त्याच्या पत्नीने आपला पती असल्याचे पोलिसांना सांगितले.मृतदेहाची ओळख पटली असली तरी पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. मृतदेहाची ‘डीएनए’ चाचणी केली जाणार आहे. त्यामुळेच डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह नेमका कोणाचा हे स्पष्ट होणार आहे. सोमवारी डीएनएसाठी मृतदेहाचे नमुने पाठविण्यात येणार असून, प्रीतेश याच्या सख्ख्या भावाचे रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत, असे आचरा पोलिसांकडून सांगण्यात आले.दरम्यान, पत्नीने आपला कोणावर संशय नसल्याचे आचरा पोलिसांना दिलेला जबाबात म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद व सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई हे करीत आहेत.१३ पासून नॉट रिचेबल; नातेवाइकांकडून शोधाशोधप्रीतेश हा पुणे येथे आयटी कंपनीत कामाला होता. तो हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी जातो, असे सांगून ८ जानेवारीला घरातून बाहेर पडला. त्यानंतर १३ जानेवारीपर्यंत पत्नीच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याच्याशी पत्नीचा संपर्क होऊ न शकल्याने पुणे येथे १४ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. याचदरम्यान प्रीतेश याची सही असलेले पत्र  १८ रोजी पत्नीच्या भावाला प्राप्त झाले.पत्रात आजारपण व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. नातेवाइकांना पत्र प्राप्त होताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांचा माग कुठेच लागला नव्हता, असे पत्नीच्या जबाबात म्हटले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस