शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग ग्रामसचिवालय इमारतीचे

By admin | Updated: November 9, 2014 23:35 IST

काम लवकरच सुरु होणार : नानचे

दोडामार्ग : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनमधून कसई- दोडामार्ग ग्रामपंचायतीला ‘ग्रामसचिवालय’ नूतन इमारत बांधकामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात या ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार आहे. त्या अनुषंगाने जुन्या आराखड्यात बदल करून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यातच ग्रामसचिवालयाची इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सरपंच संतोष नानचे यांनी दिली. कसई-दोडामार्ग ग्रामपंचायतीच्या इमारतीला लागूनच एकूण चौदा गुंठे जागेत ग्रामसचिवालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी नारायण राणे यांनी जिल्हा नियोजनमधून दहा लाखाचा निधी मंजूर केला. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत हा निधी राणे यांनी मंजूर करून दिल्याचे नानचे यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीची जुनी इमारत सध्याच्या इमारतीला लागून आहे. ही इमारत पूर्णपणे कोसळलेल्या अवस्थेत असून मातीचा ढीग साचलेला होता. या ठिकाणी ग्रामसचिवालयाला निधी मंजूर झाल्याचे ग्रामपंचायतीला कळविताच सरपंच नानचे यांनी ही जागा सपाटीकरणाचे काम हाती घेतले आहे. दोडामार्ग ग्रामपंचायतीची भविष्यात नगरपंचायत होणार असल्यामुळे त्या अनुषंगाने पूर्वीचा आराखडा बदलून तो नव्याने पाठविण्यात आला आहे. मंजूर निधीमधून इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे वाढीव निधीची मागणी केली आहे. इमारतीचा नवीन आराखडा तयार होऊन मिळताच कामाला सुरुवात होणार असून येत्या काही महिन्यातच ग्रामसचिवालयाची सुसज्ज इमारत उभी राहणार असल्याचे सरपंच संतोष नानचे यांनी सांगितले. (वार्ताहर)