शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Budget session: आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी-विरोधक व्यस्त, परशुराम उपरकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:02 IST

सध्या वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होताना दिसत नाही.

कणकवली : सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाची प्रतिष्ठा राखली जात नाही. आमदारांचे विविध प्रश्न तसेच मतदारसंघाचा विकासनिधी, सांघिक विकासकामे याबाबत मांडणी केली जाते. मात्र सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमेकांची उणीधुनी काढत, लोकप्रतिनिधी कोट्यवधीची माया कशी जमा करतात हे दाखवून देत जनतेची करमणूक केली जात आहे. अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यलयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, सध्या वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होताना दिसत नाही. प्रशासनातील अनेक अधिकारी मुजोर झाले आहेत. संबधित खात्याच्या मंत्र्याला जे जमणार नाहीत असे आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष तसेच विरोधी भाजपा पक्ष बदनाम होत आहेत.टक्केवारीच्या राजकारणात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त झालेला निधी मागील वर्षी अखर्चित राहिला होता. यावर्षीही तशीच स्थिती आहे. रिक्त असलेली जिल्हा शल्यचिकित्सक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे भरण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यांना जनतेच्या आरोग्याचे तसेच इतर प्रश्नांचे काहीच वाटत नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी खर्च होणाऱ्या निधीवर स्वतः लक्ष ठेवून जनतेने दर्जेदार काम करून घेणे गरजेचे आहे. आता जनतेलाच या लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवावा लागेल. तरच काही प्रमाणाततरी परिस्थिती सुधारेल असे परशुराम उपरकर शेवटी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvidhan sabhaविधानसभाVidhan Parishadविधान परिषदMNSमनसे