शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सोनाळीत वृद्ध महिलेचा निर्घृण खून, नराधमाकडून अतिप्रसंगाचे कृत्य; वैभववाडी तालुका हादरला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 11:48 IST

घटनास्थळी पोलिसांनी नराधमाच्या शोधासाठी श्वानपथक बोलवून तपास केला

वैभववाडी : तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथे ७० वर्षांच्या वृद्धेवर अज्ञाताने अतिप्रसंग करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. जयश्री रामदास साटम-थोटम (६५) असे या मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे तालुका हादरला आहे. घटनास्थळी पोलिसांनी नराधमाच्या शोधासाठी श्वानपथक बोलवून तपास केला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जयश्री साटम या सोनाळी येथे एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कुटुंबासह नावळे येथे वास्तव्यास आहे. रात्री पावणेआठच्या सुमारास सरपंच भीमराव भोसले जयश्री यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. मात्र, दरवाज्याबाहेर त्यांना पुरुषाचे चप्पल दिसले. त्यामुळे जयश्री यांना भोसले यांनी अंगणातूनच हाक मारली. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा ढकलला असता जयश्री या रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्रावस्थेत आढळून आल्या तेव्हा त्यांची अखेरची घरघर सुरू होती.हे दृश्य पाहून भांबावलेल्या भोसले यांनी शेजारच्यांना हाक मारली परंतु तिथून प्रतिसाद न मिळाल्याने ते आपली दुचाकी घेऊन वाडीत माहिती देण्यासाठी गेले. तिथून ते घटनास्थळी परतले तेव्हा जयश्री साटम यांच्या दरवाज्याबाहेरची ती चप्पल गायब होती. त्यामुळे भोसले यांनी पोलिस पाटील रावराणे यांच्यामार्फत पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचले.पोलिसांनी घरात तसेच आजूबाजूच्या शेतासह जंगलात जाऊन शोध घेतला. मात्र, तो नराधम आढळून आलेला नाही. घटनास्थळावरील परिस्थितीवरून त्या नराधमांने अतिप्रसंग करून जयश्री यांचा निर्घृण खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे वैभववाडी तालुका हादरुन गेला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस