शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत शहरात पुन्हा धाडसी चोरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:50 IST

Crimenews, sindhudurg, police कणकवली शहरात चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. शुक्रवार ६ नोव्हेंबरला मध्यरात्री कणकवली शहरातील एक बंगला व ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देकणकवलीत शहरात पुन्हा धाडसी चोरी !एका बंगला व ३ फ्लॅट फोडले; कपाटे उचकटून रोख रक्कम केली लंपास

सुधीर राणे

कणकवली : कणकवली शहरात चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. शुक्रवार ६ नोव्हेंबरला मध्यरात्री कणकवली शहरातील एक बंगला व ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बंद फ्लॅट व बंगला लक्ष करुन चोरट्यांनी पुन्हा चोरीचे सत्र सुरु केले आहे. कणकवली शहरातील जळकेवाडी येथील पत्रकार सदनामधील भालचंद्र बाजीराव साटम यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी ८० हजारांची रोख रक्कम लंपास केली.तसेच चांदीच्या साखळ्या व भांडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे.तसेच श्रीराम अपार्टमेंट मधील मनीषा शशिकांत गावकर रूम नंबर ३१८, नाथ पै नगर , कणकवली यांचा फ्लॅट फोडला.

वडीलांची शस्त्रक्रिया करण्यासाठी घरात ठेवलेली ७० हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली.दोन्ही फ्लॅट मध्ये कपाट उचकटून चोरट्यांनी चोरी केली आहे. तसेच श्रीराम अपार्टमेंटमधील बी विंग मध्ये बाळकृष्ण लक्ष्मण सावंत यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे. त्याचबरोबर शिवनेरी महापर्व बंगला चोरट्यांनी फोडला. मालक उदय शिवाजी सावंत असून ते सध्या पुण्याला आहेत.

या बंगल्यातही चोरीचा प्रयत्न त्यांनी केला आहे.एकूण चार ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. चोरीची घटना झाल्याचे समजताच कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कदम , सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात,पोलीस हवालदार के.के.मेठे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.तसेच श्वान पथकाव्दारे चोरांचा माग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग