शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली दरीतून बाहेर काढला मृतदेह, ओळख पटविण्याचे आव्हान; शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 21, 2023 11:37 IST

मृत युवक नेमका कोण, याठिकाणी कशासाठी आला होता याचा तपास सुरु

आंबोली (सिंधुदुर्ग) : येथील खोलदरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. मात्र तो युवक कोण, कुठून आला होता हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला, असावा असा अंदाज पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीची आत्महत्या की, घातपात हे मात्र शवविच्छेदनानंतर कळणार आहे. परंतु तूर्तास तरी त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सावंतवाडी व आंबोली पोलिसांच्या टीमसह रेस्क्यू टीमच्या मदतीने सकाळी आठ वाजल्यापासून मदत कार्य सुरू करण्यात आले. आंबोली रेस्क्यू टीमच्या साह्याने तेथील पोलिस सुरज पाटील, दत्ता देसाई, मनीष शिंदे, दीपक शिंदे आदी सहकारी खोल दरीत उतरले. यावेळी झुला करून दरीत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तुर्तास तरी पडल्याची खुण वगळता मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे घातपाताचा संशय नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. तो मृतदेह सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. मृत युवक नेमका कुठचा, कशासाठी आला होता याचा तपास करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने तपासाची सूत्रे फिरवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस