वैभववाडीत पेट्रोल पंपानजिक आढळला युवकाचा मृतदेह; पोलिस तपास सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2025 12:34 IST2025-01-16T12:32:49+5:302025-01-16T12:34:09+5:30

तालुक्यात खळबळ : ओळख पटलेली नाही

body of a youth found near a petrol pump in vaibhavwadi police investigation underway | वैभववाडीत पेट्रोल पंपानजिक आढळला युवकाचा मृतदेह; पोलिस तपास सुरु

वैभववाडीत पेट्रोल पंपानजिक आढळला युवकाचा मृतदेह; पोलिस तपास सुरु

प्रकाश काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, वैभववाडी(सिंधुदुर्ग): वैभववाडी शहरातील पेट्रोल पंपानजिक अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आल्याने सकाळीच तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत युवकाच्या टीशर्टवर 'ईसबा देवी' अशी प्रिंट आहे. या तरुणाचा अपघात झाला की घातपात याबाबत उलट सुलट चर्चा सुरु असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

आज सकाळी पेट्रोल पंपाच्या मालक यांच्या ही घटना निदर्शनतात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटना समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, अजित पडवळ, हरीश जायभाय, जितेंद्र कोलते, अभिजीत तावडे, अजय बिलपे, समीर तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मृताकडे ओळख पटविण्यासारखा पोलिसांना कोणताही पुरावा आढळला नाही. 

त्यामुळे नगरपंचयातीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले जात आहे. त्याद्वारे मृत व्यक्तीचा अपघात झालाय का? आहे का हेही तपासले जात आहे. दुपारपर्यंत आद्यपही मृतदेहाची ओळख पटली नसल्याने हा अपघात की घातपात असा पोलिसांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान देवगड तालुक्यात ईसबा देवी असल्याचे समजते. त्यामुळे हा मृत युवक देवगड तालुक्यातील आहे का? याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल चौकशी करीत आहेत. मृत युवक बुधवारी(ता.१५) वैभववाडी बाजारपेठेत फिरत होता, अशीही कुजबूज सुरू आहे. पण त्याच्या बाबतीत नेमकं घडले काय? आणि तो आहे कुठला? याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: body of a youth found near a petrol pump in vaibhavwadi police investigation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.