शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

काळसेतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कर्ली नदिपात्रात, आकस्मिक मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 15:58 IST

missing youth, sindhudurgnews, accident, मालवण तालुक्यातील काळसे भंडारवाडी येथील भूषण हनुमंत परब (वय -२८) हा रविवारपासून घरातून बेपत्ता असलेला तरुण सोमवार सकाळी काळसे गावानजीक वाहणाऱ्या कर्ली नदीमध्ये काळसे बागवाडी जेटी नजीकच्या गणपती साना परिसरात नदीच्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आला.

ठळक मुद्देकाळसेतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कर्ली नदिपात्रात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद

अमोल गोसावी चौके - मालवण तालुक्यातील काळसे भंडारवाडी येथील भूषण हनुमंत परब (वय -२८) हा रविवारपासून घरातून बेपत्ता असलेला तरुण सोमवार सकाळी काळसे गावानजीक वाहणाऱ्या कर्ली नदीमध्ये काळसे बागवाडी जेटी नजीकच्या गणपती साना परिसरात नदीच्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आईवडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.याबाबतीत सविस्तर वृत्त असे की काळसे भंडारवाडी येथील मोलमजुरी आणि माडाच्या झाडांवर चढून नारळ काढण्याची कामे करणारा अविवाहित तरुण भूषण हनुमंत परब हा आपल्या आई वडिलांसोबत येथे राहत होता.

दरम्यान रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता त्याची आई त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली असता भूषण त्याच्या खोलीत आढळून आला नाही. त्यावर तो सकाळीच उठून नेहमीप्रमाणे कुणाच्यातरी मजुरीच्या कामास गेला असे घरच्यांना वाटले त्यामुळे त्यावेळी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही.

परंतु दुपारनंतरही भूषण घरी न परतल्याने घरच्यांची चिंता वाढली आणि मग शेजारील तरुणांनी त्याला शोधण्यास सुरुवात केली. तसेच पोलीस पाटील विनायक परब यांच्याशी संपर्क साधून भूषण बेपत्ता असल्याची खबर कट्टा पोलिस स्थानकात देण्यात आली.बेपत्ता भूषणची शोधाशोध सुरू असतानाच आज, सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी गावातील काही तरुणांना काळसे गावाशेजारुन वाहणाऱ्या कर्ली खाडीपात्रात काळसे बागवाडी गणपती जेटी येथील गणपती साना नजीकच्या नदिपात्रात भूषणचा मृतदेह तरंगताना दिसून आला.

या घटनेची खबर पोलीस पाटील आणि पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर मालवण पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण, कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रुक्मांगद मुंडे, पोलीस नाइक वाय. डब्ल्यू सराफदार , कॉन्स्टेबल एस. बी. पुटवाड , आणि काळसे पोलीस पाटील विनायक परब  यांनी घटनास्थळी पाहणी केली.

गावातील तरुण बाळू खोत, मंगेश हळवी, संदीप नार्वेकर बाळु आचरेकर, बाळा कोळगे, अजित परब , चिंतामणी प्रभु आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने भूषणचा मृतदेह नदिपात्रातून बाहेर काढला व घटनेचा पंचनामा केला. भूषणचे वडील हनुमंत परब  यांनी घटनास्थळी मृतदेहाची ओळख पटवली.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब, सरपंच केशव सावंत, उपसरपंच उल्हास नार्वेकर , आणि ग्रामस्थ उपस्थित होते. चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी आणि कर्मचारी एन. डी. चव्हाण यांनी शवविच्छेदन करून भूषणचा मृतदेह नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या ताब्यात दिला.दरम्यान भूषण याला नदिपात्रात गळ टाकून मासे पकडण्याची आवड होती. त्या दरम्यान अपघाताने तोल जाऊन तो नदित पडला असावा आणि त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज घटनास्थळी उपस्थित काही शेजारी व ग्रामस्थांनी व्यक्त केला. तरीही सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण, कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रुक्मांगद मुंडे यांची टीम याबाबत अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग